सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारीला राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केलं. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. त्यानंतर या दोघांनी मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या या रिसेप्शन पार्टीला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पण सर्वाचं लक्ष सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टने वेधून घेतलं. या पार्टीतील एका व्हायरल व्हिडीओमुळे आता आलियाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडियावर सध्या आलिया भट्टचा सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये आलिया शिमरी साडीमध्ये सुंदर दिसत आहे. आलिया या पार्टीमध्ये एकदम साध्या लुकमध्ये दिसली. मात्र यावेळी तिच्याबरोबर पती रणबीर कपूर मात्र कुठेच दिसला नाही. आलिया सुरुवातीला एकटीच या पार्टीत आली होती मात्र नंतर सासू नीतू कपूर यांच्याबरोबर फोटोसाठी पोज देताना ती दिसली.

आणखी वाचा- “ती कधीच कोणासमोर…”, बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर गर्लफ्रेंडबद्दल बोलला एमसी स्टॅन

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे आलियाला ट्रोल केलं जात आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “ती किती हरवलेली आणि उदास दिसत आहे. तिचे डोळे पाहून लक्षात येतं की तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं झालं किंवा ती सिद्धार्थ कियारामुळे दुःखी आहे.” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “आलियाला पाहून असं वाटतंय की तिला तर या पार्टीमध्ये यायचंच नव्हतं, पण ती नाइलाजाने आली आहे. ती कुठेतरी हरवल्यासारखी दिसत आहे. तिचा चेहराही विचित्र दिसतोय.” तर आणखी एका युजरने, “स्वतःच्या लग्नात कोणालाच बोलवलं नाही आणि आता एक्सच्या रिसेप्शनमध्ये आली आहे.”

आणखी वाचा- Video : सिल्क साडी, कमनीय बांधा, सिद्धार्थ कियाराच्या रिस्पेशनमध्ये शिल्पा शेट्टीच्या लूकची चर्चा; नेटकरी म्हणाले “हिच्यापुढे नवी नवरी….”

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून एकत्र बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर काही वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि पुढे आलियाने रणबीर कपूरशी लग्न केलं. करण जोहरच्या चॅटशोमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना सिद्धार्थने “मी माझ्या एक्सच्या मांजरीला खूप मिस करतो असं म्हटलं होतं.” दरम्यान कियारा आणि सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

Story img Loader