बॉलीवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टने न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या ‘मेट गाला’ला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरील तिच्या स्टनिंग लूकची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी आलियाने ‘मेट गाला २०२४’मध्ये परिधान केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेट गालातील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आलिया या डिझायनर साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. या खास दिवशी अभिनेत्रीने तिच्या कानामागे काजळाचा काळा टिका लावला होता आणि आलियाच्या चाहत्यांना तिच्या फोटोमध्ये हा टिका दिसला असून आता हा विषय चर्चेचा ठरला आहे.
आलियाने लावलेल्या या काजळाच्या काळ्या टिकातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तिने काळा टिळा लावलाच पाहिजे, कारण ती या साडीमध्ये खूप सुंदर दिसतेय.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बुरी नजरवाले तेरा भी हो भला”
एक जण कमेंट करत म्हणाला, “ती खूप गोंडस दिसतेय, नजरेसाठी काळा टिळा लावून तिने बरंच केलं.” “जर तिने काळा टिळा लावला तर काय झालं, आपण भारतीय आहोत आणि हे आपल्या देशात अगदी सामान्य आहे”, असंही एक जण म्हणाला.
आलियाच्या या लूकचं जितकं कौतुक झालं तितकं ट्रोलिंगही झालं. नकारात्मक विचार करणारी, उगाच वाईट बोलणारी माणसं सोशल मीडियावर सर्रास सापडतात. मग ते ट्रोलिंग असो किंवा हेट कमेंट, कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांचे विचार ते निर्भीडपणे मांडतात. अनेक नेटकऱ्यांनी आलियाच्या या फोटोवर तिला ट्रोल केलं आहे.
हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल
“मला तर ही मोंजोलिका वाटतेयं”, असं एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं. तर दुसरा म्हणाला, “हिला कोण नजर लावेल?”, “मोंजोलिकाला कोण नजर लावेल?” असं एक जण म्हणाला.
दरम्यान, आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आलिया ‘जिगरा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ‘द आर्चिज’फेम वेदांग रैना आलियाबरोबर प्रमुख भूमिकेत दिसेल. याशिवाय आलियाचा ‘लव्ह ॲण्ड वॉर’ चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.