६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (२४ ऑगस्ट रोजी) दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला देण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा झाल्यावर आलिया भट्ट व क्रिती सेनॉनने आभार मानत भावना व्यक्त केल्या. आलिया व क्रिती दोघींच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्टची पोस्ट

फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “संजय सर.. संपूर्ण टीम.. माझे कुटुंब.. माझी टीम आणि माझे प्रेक्षक.. हा राष्ट्रीय पुरस्कार तुमचा आहे.. कारण तुमच्याशिवाय काहीही शक्य नाही…खरंच मी खूप आभारी आहे..मला आशा आहे की जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी तुमचं मनोरंजन करत राहीन..गंगू (जी आलिया भट्ट म्हणूनही ओळखली जाते).”

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

यावेळी आलियाने क्रितीला पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचं कौतुक केलं. क्रितीला तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया म्हणाली, “ज्या दिवशी मी ‘मिमी’ पाहिला होता, त्या दिवशी मला तुला मेसेज केला होता. तो खूप प्रामाणिक आणि दमदार परफॉर्मन्स होता.. सिनेमा पाहून मी खूप रडले होते.. तू खूप अप्रतिम आणि पुरस्कारास पात्र आहेस..अशीच चमकत राहा.”

क्रिती सेनॉनची पोस्ट

क्रितीने लिहिलं, “मला अजूनही विश्वास बसत नाहीये, मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मला हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यासाठी माझी कामगिरी योग्य वाटणाऱ्या ज्युरींचे आभार. डिनो मी तुझे आभार कसे मानू की तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभा राहिलास आणि मला हा चित्रपट दिला. लक्ष्मण सर तुम्ही नेहमी मला सांगायचे की बघ तुला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, सर मिळाला आणि तुमच्याशिवाय मी हे करू शकले नसते. मम्मी, नुपूर, पापा, तुम्ही माझी लाईफलाईन आहात. नेहमी माझे चीअरलीडर बनल्याबद्दल धन्यवाद.”

क्रितीनेही आलिया भट्टचं कौतुक केलं. “आलिया तुझेही अभिनंदन, तू हा अवॉर्ड डिझर्व्ह करतेस. मला तुझे काम नेहमीच आवडायचे. हा क्षण तुझ्याबरोबर शेअर करायला मी खूप उत्सुक आहे,” असं क्रिती म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt kriti sanon reaction after winning national award for best actress hrc