सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. कोणी फटाके उडवत, कोणी नातेवाईकांच्या घरी जात, तर कोणी आपल्या घरच्यांबरोबर फराळाचा आनंद घेताना दिसतोय. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवाळीनिमित्त पार्ट्याही आयोजित केल्या होत्या. त्या पार्ट्यांना बॉलिवूडमधील बड्या कलाकारांनीही हजेरी लावली. पण या सगळ्यात आलिया भट्ट कुठेच दिसली नाही. तसंच यावर्षीच्या दिवाळीचा तिने एकही फोटो पोस्ट केला नाही. याचं काय कारण असेल असा अंदाज तिचे चाहते लावत होते. पण आता स्वतः आलियाने कोणत्याही समारंभात न दिसण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : Video: दीपावलीच्या शुभ दिनी अक्षय कुमार देव भक्तीत तल्लीन; त्याच्या ऑफिसमधील पूजेचा व्हिडीओ पाहिलात का?

आलिया गेले काही दिवस ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. विविध शहरांमध्ये जाऊन त्यांनी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशीही आलिया त्याच्याबरोबर दिसली. आलियाच्या स्टाईलचे चाहते असलेले सगळेजण ती दिवाळीत कोणत्या लूकमध्ये दिसणार याकडे डोळे लावून होते. कारण आलिया भट्टची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी. पण यंदा आलिया कशाप्रकारे दिवाळी साजरी करत आहे हे तिने सांगितलं आहे.

आलियाने दिवाळीनिमित्त इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली. आलियाने इन्स्टाग्रामवर २ फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिला फोटो हा गेल्या वर्षीचा दिवाळीचा फोटो आहे. त्यात तिने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे आणि तिच्या हातात पणती दिसत आहे. तर दुसऱ्या लेटेस्ट फोटोत ती घरच्या कपड्यांमध्ये तिच्या बेडरूममध्ये आराम करताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “हॅप्पी दिवाळी!! एक गेल्या वर्षीची मी आणि एक आताची मी. यंदाची दिवाळी मी बेडवर आराम करत साजरी करत आहे.”

हेही वाचा : आलिया भट्टला आतुरता ज्युनिअर कपूरच्या आगमनाची, होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय

आलियाचा आता लवकरच आई होणार आहे. तसेच बाळाच्या जन्मानंतर आलिया कामातून एका वर्षाची सुट्टी घेणार आहे. त्यानंतर ती फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफही दिसणार आहेत.

Story img Loader