अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सध्या सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आलियाने चार दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अनेकांनी आलिया-रणबीरच्या पहिल्या बाळाचं स्वागत केले आहे. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. नुकतंच सोनी राजदान यांनी त्यांची लेक आलिया आणि नात कशी आहे याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळाले.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग बुधवारी रात्री आयोजित करण्यात आलं होतं. अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यांच्यासह बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी ‘ऊंचाई’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टची आई सोनी राजदानही उपस्थित होत्या. यावेळी सोनी राजदान यांना प्रसारमाध्यमांनी नातीविषयी आणि लेकीविषयी अनेक प्रश्न विचारले.
आणखी वाचा : मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष
त्यावेळी त्या म्हणाल्या, “हे देवाचं एक वरदान आहे. त्याचे आशीर्वाद आहेत. निसर्गाने दिलेली देणगी आहे, असे आम्ही मानतो. मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. या सर्व गोष्टी योग्यरित्या पार पडल्या यासाठी मी फारच आभारी आहे. बाळ उत्तम आहे आणि बाळाची आईही उत्तम आहे. सर्व काही सुरक्षित आहे. जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा खूप भीती असते. त्यामुळे आम्ही सर्वजण तिच्यासाठी प्रार्थना करत होतो की हे सर्व काही नीट व्हावे आणि ते तसेच झाले. त्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत.”
यावेळी सोनी राजदान यांना तुम्ही आलियाला काही टीप्स दिल्या आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हटके स्टाईलने उत्तर दिले. “मी तिला खूप टिप्स दिल्या आहेत. शेवटी मीही एक आई आहे त्यामुळे तिला टीप्स देणे हे माझे कर्तव्य आहे. मी तिला खूप टीप्स दिल्या आहेत. पण ती देखील एक आई आहे. तिला तिच्या बाळाच्या संगोपनाबद्दल नक्कीच काही तरी विचार केला असणारच. पण ती फारच छान आहे”, असे सोनी राजदान म्हणाल्या.
आणखी वाचा : “मुलगी होण्यापेक्षा…” आलिया भट्टच्या पोस्टनंतर अक्षय कुमारचा रणबीर कपूरला सल्ला
दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. आलिया भट्टने ६ नोव्हेंबरला दुपारी १२ ते १२.३० वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.