कपूर आणि भट्ट कुटुंबियांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. आज आलिया आणि रणबीर आई बाबा झाले. काही वेळापूर्वीच आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर तिने हे बातमी शेअर करतास त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रणबीर आणि आली याच्या मुलीची झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक असून त्यांच्या लेकीचं नाव ते काय ठेवणार याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच आलियाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्यात तिने तिच्या आवडत्या नावाचा उल्लेख केला आहे. आता आलिया तिच्या मुलीचेही तेच नाव ठेवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२२ हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या रणबीर आणि आलिया यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या दोन्ही चित्रपटांचे आलियाने जोरदार प्रमोशन केले होते. दरम्यान गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता.
आणखी वाचा : आई झाल्यानंतर आलिया भट्टची पहिली पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…
त्यावेळी एका मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आले, “आलियाच्या ऐवजी तुझे दुसरे एखादे नाव असते, तर ते काय असलेले तुला आवडले असते?” या प्रश्नाचे उत्तर देताना आलियाने तिच्या आवडत्या नावाचा उल्लेख केला. तिला आवडणाऱ्या नावाचा संबंध रणबीरच्या नावाशी असल्याने तिच्यासाठी हे नाव खास असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल
त्या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली, ” मला आवडणारे नाव ‘आयरा’ आहे.” या नावाच्या स्पेलिंगमध्ये आलियाचा ‘आ’ आणि रणबीरचा ‘रा’ असल्याने ती दोघे त्यांच्या लेकीचे नाव ‘आयरा’ असे ठेवतील, असा त्यांच्या चाहत्यांचा अंदाज आहे. आयरा या नावाचा अर्थही खूप सुंदर आहे. या नावाचा अर्थ आहे – जिचा सन्मान होतो, जिच्याकडून प्रेरणा घेतली जाते. त्यामुळे आलिया आणि रणबीर त्यांच्या लेकीचे नाव ‘आयरा’ ठेवणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत.