बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटातील पहिले गाणे “तुम क्या मिले…” रिलीज करण्यात आले. गाणे रिलीज झाल्यावर करण जोहरने या गाण्याचे शूटिंग राहाचा जन्म झाल्यावर करण्यात आले होते असा खुलासा केला. करणने केलेला खुलासा ऐकून, आलियाने एवढ्या कमी वेळात वजन कसे कमी केले याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. यावर आता आलिया भट्टने व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कतरिना कैफसह २० वर्षे काम करणारी ‘ती’ व्यक्ती कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्यासाठी ते अनेकदा रडले…”

आलिया भट्टने राहाच्या जन्मानंतर वजन कसे कमी केले याबाबत युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “राहाच्या जन्मानंतर बरोबर ६ आठवड्यांनी मी व्यायाम करायला सुरुवात केली. कारण, “तुम क्या मिले…” या गाण्याच्या शूटिंगसाठी मला ४ महिन्यात पुन्हा आधीसारखे दिसायचे होते. राहा झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा मी व्यायाम सुरु केला तेव्हा, सुरुवातीला अगदी हळूहळू व्यायाम केला. जास्त मेहनत घेतली नाही, स्वत:ला पूर्ण वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर माझे वजन कमी झाले.”

हेही वाचा : धनुषबरोबर १८ वर्षांचा संसार मोडल्यावर ऐश्वर्या रजनीकांत करणार दुसरं लग्न?

आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी लेक राहाला जन्म दिला. यानंतर ६ आठवडे पूर्णपणे आराम करून फक्त राहाला वेळ दिल्याचे अभिनेत्रीने सांगितले. “तुम क्या मिले…” गाण्यात आलियाचा पुन्हा आधीसारखा लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच राहाच्या जन्मानंतर ४ महिन्यांतच बर्फात शूट करताना आलियाला शिफॉन साड्या घालायला लावल्या म्हणून करणने पोस्ट शेअर करून अभिनेत्रीची माफी सुद्धा मागितली होती.

हेही वाचा : “चंदेरीत पुन्हा ‘स्त्री’ची दहशत…”, ‘स्त्री २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, श्रद्धा कपूरने शेअर केला थरारक व्हिडीओ

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt on losing post pregnancy weight in just 4 months for tum kya mile song sva 00