आलिया भट्ट सध्या वासन बाला यांच्या ‘जिगरा’ चित्रपटातील भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवत आहे, या सिनेमात तिच्या अभिनयातील प्रगती स्पष्ट दिसते. तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ‘हायवे’ या चित्रपटाने गाठला होता, ज्यामध्ये तिने दमदार अभिनय कौशल्याचे प्रदर्शन केले होते. ‘हायवे’च्या प्रमोशनदरम्यान, आलियाने तिचे वडील महेश भट्ट यांनी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली होती आलिया भट्ट?

बॉलीवूड हंगामाशी बोलताना आलियाने म्हटले होते, ‘आशिकी २’नंतर मी मोहित सुरीला फोन करून म्हटलं, ‘’आता वेळ आली आहे की तू माझ्यासाठी एक चित्रपट करावा.’ मी नेहमी माझ्या वडिलांना सांगते, ‘तुम्ही मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट करावा.’ या वक्तव्यातून आलियाची महत्त्वाकांक्षा आणि तिने स्वत:साठी ठरवलेली मोठी ध्येये दिसून येतात. महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांनी ‘सडक २’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही, तरी आलियाच्या प्रतिभेची दखल घेऊन तिला संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमात संधी दिली होती, याच सिनेमातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा…अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला दिलेलं भेटीचं निमंत्रण, ती किस्सा सांगत म्हणाली…

आलिया भट्टने तिच्या करिअरमधील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. तिच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील पदार्पणानंतर ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’ यांसारख्या चित्रपटांतील दमदार कामगिरीमुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे.

सध्या आलिया आणि वेदांग रैना यांचा ‘जिगरा’ चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला असून, या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ‘जिगरा’ने पहिल्या दिवशी ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामध्ये देशातील प्रमुख तीन मल्टिप्लेक्स चेनमध्ये सुमारे १८,००० तिकिटे विकली गेली. हा चित्रपट सुमारे २,२०० ते २,५०० थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

हेही वाचा…“स्त्रीविषयक चित्रपट…”, कंगना रनौतने आलिया भट्टवर केली अप्रत्यक्ष केली टीका; म्हणाली…

‘जिगरा’ला राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडीओ’शी स्पर्धा करावी लागत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी अंदाजे पाच कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt once requested father mahesh bhatt to create a national award worthy film for her psg