आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांना कन्यारत्न झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांनी एकत्र साजरे केलेल्या सणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २०२२ वर्ष खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी लकी ठरले आहे. मागच्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्यांनी एका मुलीला जन्मदेखील दिला आहे. ‘राहा असं मुलीचे नाव ठेवले असून तिच्या आगमनाने कपूर कुटुंबिय सध्या खुश आहेत.

आलिया आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. मात्र ती आता काम करणार नाही अशी चर्चा असताना इटाईम्सशी बोलताना तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ती असं म्हणाली, “होय, माझ्या करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करून मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या कामात लग्न किंवा मातृत्व काहीही बदलेल असं कोण म्हणतं? असे जरी झाले मला त्याची पर्वा नाही. मला माहित होते की आयुष्यात मला मूल होण्याच्या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

“नव्या वर्षाची सुरवात ‘पठाण’बरोबर…” शाहरुख खानने २०२३च्या शुभेच्छा देत चाहत्यांना केले आवाहन

आलियाच्या गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही, ती वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

आलिया फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होती. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

Story img Loader