बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही आई झाली आहे. आलियाने काही तासांपूर्वी गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर आई-बाबा झाल्याचे कळताच त्यांचे चाहतेही फार खूश झाले आहेत. आलियाने बाळाला जन्म दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आलियाच्या या पोस्टवर अभिनेता अक्षय कुमारनेही कमेंट करत रणबीरला सल्ला दिला आहे.

आलिया भट्टने तिच्या बाळाच्या जन्मानंतर याबद्दलची गुडन्यूज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने सिंहाच्या कळपाचा फोटोही शेअर केला आहे. त्याबरोबर तिने त्याला कॅप्शनही दिले आहे. “आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर”, असे तिने म्हटले आहे.
आणखी वाचा : Alia-Ranbir Blessed with Baby Girl : आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात छोट्या परीचं आगमन

आलिया भट्टच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारने तिच्या या पोस्टवर कमेंट करत रणबीरला सल्ला दिला आहे. “अभिनंदन आलिया भट्ट आणि रणबीर. मुलगी होण्यापेक्षा जगात दुसरा कोणताही मोठा आनंद नाही. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद”, असे अक्षय कुमार म्हणाला.

akshay kumar

आणखी वाचा : “मी नवा सूर्य उगवण्याची…” नातीच्या जन्मापूर्वी आलियाच्या वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज (६ नोव्हेंबर) सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर दुपारी १२ ते १२.३० वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.

Story img Loader