बॉलीवूडचे रोमॅंटीक कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दोघांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याची नेहमी चर्चा रंगलेली असते. दोन वर्षांपूर्वी आलिया आणि रणबीर याच दिवशी लग्नबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात राहाचं आगमन झालं आणि रणबीर-आलियाच्या लाडक्या लेकीमुळे कपूर कुटूंब पूर्ण झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. आलियाने तिचा आणि रणबीरचा ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट क्लोज अप फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत डिझ्नीच्या ‘अप’ या चित्रपटातील पात्रांचा फोटो आलियाने शेअर केला आहे. ही दोन्ही पात्र आपल्या उतारवयात आलेली आहेत आणि खूप आनंदी आहेत. असं या फोटोत दिसतंय. “आपल्या दोघांना या दोन वर्षाच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. या शुभेच्छा आजपासून ते अश्या अनेक वर्षांसाठी. ” असं कॅप्शन आलियाने या फोटोला दिलं.

आलियाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा देत कमेंट्स केल्या आहेत. “तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” असं करिश्मा कपूरने लिहिलं. तर आयुष्मान खुरानाने रेड हार्टचा इमोजी कमेंट करत आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठमोळे कलाकार सुकन्या माने, ऋतुजा बागवे अश्या अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा… मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला पॅरिसमधला खास फोटो; म्हणाला, “माझं प्रेम…”

दरम्यान रणबीर आणि आलियाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी आलिया-रणबीरने लग्नगाठ बांधली. आलिया ११ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूर तिला आवडत असल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना आलियाने पहिल्यांदा रणबीरला पाहिलं. तेव्हा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

हेही वाचा… मातीचं घर, विटांची चूल अन्…, मृण्मयी देशपांडेने पतीसह शेतात बांधलं घर

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान आलियाने रणबीर सोबत लग्न करण्याची इच्छा देखील बोलून दाखविली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर’नंतर रणबीर आणि आलिया पार्टी, कार्यक्रमादरम्यान एकमेकांना भेटू लागले. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्न सोहळ्यात आलिया आणि रणबीर जोडीने हजेरी लावल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आलियाने २०२१ला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरसाठी खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt ranbir kapoor completed two years on wedding alia shared post on instagram dvr