अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. लग्नानंतर ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने गेल्यावर्षी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आज ते दोघेही त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आलियाने एक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आलिया भट्ट ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने रणबीरबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो, पोस्ट व्हायरल
यातील पहिला फोटोत त्या दोघांना हळद लावल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत रणबीर हा गुडघ्यावर बसून आलियाला प्रपोज करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत रणबीर आणि आलिया रोमँटिक पद्धतीने नाचताना दिसत आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
आलियाने या फोटोला कॅप्शन देताना ‘आनंदाचा दिवस’ असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने इमोजीचाही वापर केला आहे.
आलियाच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. दिग्दर्शक निर्माता करण जोहरने या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर अभिनेत्री नेहा धुपियाने ‘आलिया, रणबीर, राहा’, अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर मौनी रॉयने ‘तुम्हा दोघांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे.