आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. आलियाने ६ नोव्हेंबरला (रविवारी) एका गोंडस मुलीला जन्म दिला. या सेलिब्रिटी कपलवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर कलाक्षेत्रामधील अनेक मंडळी आलिया-रणबीरला अभिनंदन करत आहेत. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये दिग्दर्शक करण जोहर मात्र चर्चेत आला आहे. आलिया व करण यांच्यामध्ये किती घट्ट मैत्री आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. आलियाला मुलगी झाल्यानंतर करणचे फोटो व मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

ranveer allahbadia statement row Javed Akhtar poetry comment
रणवीर अलाहाबादिया प्रकरणादरम्यान जावेद अख्तरांची मार्मिक टिप्पणी चर्चेत; म्हणाले, “शिवी ही भाषेतील…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Saba Azad
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
ranveer allahbadia on indias got latent video
स्पर्धकाच्या आई-वडिलांच्या प्रायव्हसीवर अश्लील वक्तव्य; रणवीर अलाहाबादियावर लोकांचा संताप, म्हणाले, “विकृत…”
Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Video Shows Best Friends Love
एक अतूट नातं! बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर ‘तिने’ नकळत स्पर्श केला मैत्रिणीच्या पायांना; आजींचा VIDEO एकदा बघाच
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल

करण जोहर का होतोय ट्रोल?
आलिया-रणबीर आई-बाबा झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली. पण हे मीम्स बनवण्यासाठी चक्क करण जोहरच्या फोटोंचा वापर नेटकऱ्यांनी केला. इतकंच नव्हे तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कार्यक्रमामधील जेठालालचे फोटोही यावेळी व्हायरल झाले.

करणनेच आलियाला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. याआधारेच एका युजरने मीम्स शेअर करत म्हटलं की, “आणखी एक स्टार किड आता तयार होणार.” तसेच दुसऱ्या एका युजरने आलिया-रणबीरच्या मुलीला भेटल्यानंतर करणची प्रतिक्रिया काय असेल? याबाबत मीम्स शेअर केलं.

“माझ्या चित्रपटाला होकार देशील का? माझ्या चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून काम करशील का?” असे प्रश्न करण आलियाच्या मुलीला विचारणार असं मीम्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलं आहे.

इतकंच नव्हे तर करण आधीच आलियाच्या लेकीसाठी चित्रपटाची कथा तयार करत असल्याचं मीम्सद्वारे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आलियाला मुलगी झाली पण करण मात्र सध्या चर्चेत आहे.

खरं तर आलियाला मुलगी झाल्यानंतर करणचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आलिया-रणबीरला मनभरून शुभेच्छा दिल्या.

Story img Loader