२०२२ मध्ये विवाहबद्ध झालेल्या बॉलिवुड सेलिब्रिटींपैकी सगळ्यात जास्त चर्चेचा लग्न सोहळा ठरला तो आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा. आलिया आणि रणबीर एकमेकांना ४-५ वर्ष डेट करत होते. त्यानंतर अखेर एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले. आता या लग्नसोहळ्यातील काही न पाहिलेला आणखी एक फोटो समोर आला आहे आणि त्या फोटोला कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
एप्रिल महिन्यात लग्न झाल्यानंतर आलिया आणि रणबीर यांनी काही दिवसांतच ते आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती. त्यांनी या संदर्भात शेअर केलेल्या पोस्टमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तेव्हापासून आलिया भट्ट ही लग्नापूर्वीच गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता लग्नाचा आणखीन फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी आलियावर याच गोष्टीवरून तिच्यावर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा : Video: चाहत्यांच्या धक्काबुक्कीपासून देबिना बॅनर्जीचं रक्षण करताना गुरमीत चौधरीला दुखापत, व्हिडीओ व्हायरल
आलिया आणि रणबीर यांच्या लग्नातील न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर आल्यावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला. या फोटोमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्याबरोबरच आणखीन एक व्यक्ती दिसत आहे. तर आलिया या फोटोमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून काळजीत असलेली वाटत आहे. या फोटोमध्ये आलियाचे एक्सप्रेशन बघून नेटकऱ्यांनी त्या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या.

हेही वाचा : ठरलं! ‘या’ महिन्यापासून आलिया भट्ट करणार कामाला सुरुवात, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी घेतेय मेहनत
एक नेटकरी म्हणाला, “ती थकलेली दिसत आहे. प्रेग्नेंट होती ना…” त्या फोटोवर कमेंट करत दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हिला भविष्याची काळजी सतावत आहे वाटतं…” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचे टेन्शन आलियाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.” सध्या त्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.