बॉलीवूडमधील सगळ्यात लोकप्रिय जोडी म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ओळखले जाते. सोशल मीडियावर दोघेही नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत दोघे चाहत्यांच्या संपर्कात असतात. मात्र, अनेकदा रणबीर आणि आलियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतंच एका मुलाखतीत आलियाने होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- राहाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले Photos, म्हणाली, “छोटी वाघीण…”

आलिया म्हणाली, “कधी कधी मला ट्रोलिंगचा त्रास होतो. पण मला कुणाचीही तक्रार कारायची नाही. मी खूप नशीबवान आहे कारण माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. नकारात्मक प्रतिक्रियेमुळे कुणीही निराश होत नाही. यासाठी मी कुणालाही दोष देऊ शकत नाही. मी कधीच काहीही बोलत नाही. काही वेळेला माझ्या बाबतीत खोटं बोलण्यात आलं आहे.”

काही दिवासांपूर्वीच आलियाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिने रणबीरबाबत मोठा खुलासा केला होता. आलिया म्हणालेली, रणबीरला मी लिपस्टिक लावलेलं आवडत नाही. त्यामुळे तो मला लावलेली लिपस्टिक काढायला लावतो. याच कारणामुळे मी न्यूड शेड्स लावते. आलियाच्याच्या या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. काहींनी त्याला काहींनी तर त्याला कबीर सिंगची उपमा दिली होती.

हेही वाचा-“हिंदीत काम करण्याचा अनुभव कसा आहे?” चिन्मय मांडलेकरने सांगितला फरक, म्हणाला “मराठी सिनेसृष्टीत…”

आलिया आणि रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच आलियाचा ‘जिगरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवासांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तर रणबीर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे.

तसेच रणबीरचा ‘रामायण चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर श्रीरामांची तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. तर आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये एकत्र दिसणार आहे.

Story img Loader