अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीने गेल्यावर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. राहाच्या जन्मानंतरचा आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आई झाल्यावर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. मात्र, आलियाने वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदारी उत्तमपणे पार पाडली.

हेही वाचा : “चित्रपट पाहिल्यावर पहिला फोन अंकुश चौधरीचा आला अन्…”, ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

आलियाने अलीकडेच ‘फेमिना’ला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समतोल साधण्याबाबत भाष्य केले आहे. अभिनेत्री म्हणाली, “जीवनात तुम्ही कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व देता हे जास्त महत्त्वाचे असते. अनेक वेळा वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळताना मी स्वत:कडे लक्ष देत नाही. एका व्यक्तीने मला सांगितले होते, ‘तू आयुष्यात कधीच चांगली आई, चांगली अभिनेत्री, चांगली मुलगी काहीच होऊ शकत नाहीस.’ यानंतर मी फक्त माझे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींबरोबर या विषयांवर मोकळेपणाने बोलते.”

हेही वाचा : आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह काढलेल्या सेल्फीची चर्चा; फोटो शेअर करत म्हणाला…

आलिया भट्ट पुढे म्हणाली, “मी नेहमीच जबाबदारीने वागण्याचा प्रयत्न करते. केवळ कुटुंबासाठी मी माझे काम नाही सोडणार किंवा कामासाठी त्यांनाही नाही सोडणार…यातून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करते.”

हेही वाचा : काजोलने करिअरमध्ये पहिल्यांदाच मोडली ‘नो-किसिंग पॉलिसी’; व्हायरल लिपलॉक सीनवर उत्तर देत म्हणाली, “लोक माझ्याबद्दल…”

दरम्यान, आलिया भट्टने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यात अभिनेत्रीने प्रचंड मेहनत करून वजन कमी केले आणि “तुम क्या मिले…” या गाण्यासाठी शूटिंग केले. सध्या आलिया भट्ट आणि रणवीर सिंह ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader