आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर दोन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आता काही महिने कामातून ब्रेक घेत ती पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. आता अशातच ती पुन्हा एकदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राहाच्या जन्मानंतर काही दिवसातच आलिया भट्टने तिचं रुटीन बदललं. आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी तिने योगाही करायला सुरुवात केली. तसंच ती आता विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसतेय. आलिया आणि रणबीरने नुकतीच एका कॅलेंडर लॉन्चच्या इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी त्यांच्या कुटुंबीयांचेही फोटो लावण्यात आले होते. ते पाहून दोघेही खुश आहेत. या दरम्यानचे त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांची नजर आलिया भट्टने परिधान केलेल्या कपड्यांवर पडली. यावेळी तिने ऑफ व्हाईट रंगाची पॅन्ट, त्यावर त्याच रंगाचा क्रॉप टॉप आणि ढगळ जॅकेट परिधान केलं होतं. तिने पुन्हा एकदा ढगळ कपडे घातल्याचं पाहून नेटकऱ्यांनी तिच्या या लूकचा संबंध तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोशी जोडला आणि ती पुन्हा गरोदर असल्याचं नेटकरी म्हणू लागले आहेत.
आणखी वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? खुलासा करत अभिनेत्री म्हणाली…
नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तिने हातामध्ये दोन फुलं घेतलेली होती आणि तो पोस्ट करताना तिने लिहिलं, “2.O…वाट बघत राहा.” आलिया भट्टचा हा फोटो पाहून आणि त्याखाली तिने दिलेली ही कॅप्शन वाचून ती पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पोस्टचा संबंध नेटकरी तिच्या कार्यक्रमावेळच्या लूकशी जोडत आहेत. पण अद्याप आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांपैकी कोणीही त्या चर्चांवर भाष्य केलेलं नाही.
हेही वाचा : “गरोदर होती ना…” लग्नातील व्हायरल फोटोवर खोचक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी केलं आलिया भट्टला ट्रोल
आलिया आणि रणबीरची लेक राहा नुकतीच दोन महिन्याची झाली. पण आलिया आणि रणबीर या दोघांनी तिचा चेहरा चाहत्यांसमोर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. राहा दोन वर्षांची होईपर्यंत तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर होणार नाही याची ते काळजी घेत आहेत. पण आता ते पुन्हा एकदा गोड बातमी देणार का, याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.