बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर खूप आनंदी आहे. सध्या ती तिच्या मातृत्वाचा आनंद मनमोकळेपणाने घेत आहे. आलिया अनेकदा तिची मुलगी राहा कपूरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. राहा जसजशी मोठी होत आहे तसतसे आलियाला एक एक नवीन अनुभव येत आहेत. नुकताच आलियाने राहाच्या एका सवयीबाबतचा खुलासा केला आहे. आलियाला राहाची ही सवय खूप आवडत असल्याचेही तिने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉंचिंगवेळी क्रिती सेनॉनने नेसली २४ कॅरेट सोन्याची साडी; काय आहे यात खास, घ्या जाणून…

आलियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला राहाची सर्वात आवडणाऱ्या गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. आलिया म्हणाली. ‘माझी मुलगी माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे. मला वाटते की, गेल्या आठवड्यात माझ्याबाबत घडलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा मी तिला दूध पाजवते तेव्हा ती माझ्याकडे बघते आणि माझ्या चेहऱ्याला स्पर्श करु लागते. हा आम्हा दोघांमधला एक रोमँटिक क्षण आहे. माझ्याबाबतीत घडलेली ही खरोखरच सर्वात चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा- “‘द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त करावा”, विश्व हिंदू परिषदेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्र

गरोदरपणात अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव कसा होता हेही आलिया भट्टने सांगितले. आई झाल्यानंतर ती अधिक सहनशील झाली आहे, असेही आलिया म्हणाली. आलिया पुढे म्हणाली, ‘माझ्या मुलीसोबतचा प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो. दररोज एक नवीन हावभाव आणि नवीन अभिव्यक्ती अनुभवली जाते. मला विश्वास आहे की, मी शिकलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. मी एक भावनिक व्यक्ती आहे, परंतु मला वाटते की, मूल आणि मातृत्व निश्चितपणे तुम्हाला स्थिरता आणि शांती देते. जर तुम्ही ते संयमाने केले, तर ते खरोखर तुम्हाला आंतरिक शक्ती देते,’ असे आलिया म्हणाली.

हेही वाचा- Video : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा केला पाठ, व्हिडीओ व्हायरल

आलिया भट्टने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही दिवसांनी आलियाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये आलिया भट्टने एका मुलीला जन्म दिला, ज्याचे नाव रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी राहा ठेवले. आलिया अनेकदा तिच्या मुलीबरोबरचे फोटो पोस्ट करत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt revealed adorable habit that her daughter raha kapoor said she has started to touch my face while feeding her dpj