बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांतील भूमिका, कधी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, तर कधी त्यांची वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या बहिणीविषयी वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे.

काय म्हणाली आलिया भट्ट?

आलिया भट्टने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिला कोणते टीव्ही शो बघायला आवडतात, याचा खुलासा केला आहे. “लॉकडाउनमध्ये नेटफ्लिक्सवरील ‘टू हॉट टू हॅण्डल’ हा डेटिंग शो पाहण्याची मला सवय लागली आणि आता हा शो माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. तुम्ही मला हे म्हणू शकता की, तू असे शो पाहण्यापेक्षा चित्रपट पाहा; ज्यामुळे तुला अभिनयाविषयी काहीतरी शिकायला मिळेल. पण, प्रामाणिकपणे सांगायचे, तर मला माझ्या पायांचे वॅक्सिंग करीत हा शो पाहायला खूप आवडते. जेव्हा मी दिवसभरात खूप थकते, तेव्हा दिवसाच्या शेवटी मी हा शो पाहणे पसंत करते. इतकी मला हा शो पाहण्याची सवय झाली आहे”, असे आलियाने म्हटले आहे.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Kapil Dev Reaction on Yograj Singh Claim That he Went to His House with Pistol to Kill Watch Video
Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

“जेव्हा माझी बहीण पूजा भट्ट बिग बॉस ओटीटीमध्य़े सहभागी झाली होती, त्यावेळी मी बिग बॉस बघायचे. मी माझ्या शूटिंग आणि कामादरम्यान बिग बॉस लाइव्ह बघत असायचे. त्यामुळे मला माझ्या बहिणीच्या नव्या गोष्टी पाहायला मिळाल्या, तिच्याविषयीचे नवीन पैलू समजले. त्यामुळे बिग बॉस लाइव्ह बघणे छान होते “, असे म्हणत ती टीव्ही शो पाहत असते याची कबुली आलियाने दिली आहे.

हेही वाचा: Video: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकारांची हजेरी; ‘स्वाद खुळा’ टास्कमुळे होणार धमाल, पाहा प्रोमो

आलिया भट्ट ही तिच्या चित्रपटांबरोबरच अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. बऱ्याचदा ती तिची लेक राहामुळे चर्चांचा भाग बनते. राहा सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. जेव्हा रणबीर आणि आलियाने पहिल्यांदा तिचा चेहऱा सर्वांना दाखवला होता, त्यावेळी ती तिच्या आजोबांसारखी म्हणजेच दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे चाहत्यांकडून म्हटले जात होते.

आलिया भट्टच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास, सध्या ती तिच्या ‘जिगरा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. आलिया भट्ट ‘जिगरा’नंतर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँण्ड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर कपूर आणि विकी कौशल हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता आलियाचा ‘जिगरा’ चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader