बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आलिया भट्टने ६ नोव्हेंबर २०२२ ला गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. राहाच्या जन्मानंतर आलियाने तिचं वजन कसं कमी केलं, याबद्दल तिने भाष्य केले आहे.

आलियाने गरोदरपणानंतर फार कमी वेळात तिचे वजन घटवले आहे. त्यामुळे तिच्या डाएट प्लॅनची सतत चर्चा पाहायला मिळते. नुकतंच आलियाने राहाच्या जन्मानंतर वजन कसे कमी केले, याबद्दल खुलासा केला आहे.

ram kapoor
श्रीमंत वडिलांनी पैसे पाठवणं बंद केलं अन्…; प्रसिद्ध अभिनेता संघर्षाचे दिवस आठवत म्हणाला, “सेकंड हॅण्ड…”
Irrfan khan friend NSD batchmates Alok Chatterjee passed away
इरफान खान यांच्या जयंंतीदिनी दुःखद बातमी, त्यांचे बॅचमेट…
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Devid Dhavan And Govinda
मुलं कधीच गोविंदाचा सल्ला घेत नाहीत; सुनीता आहुजाचं वक्तव्य; डेव्हिड धवन अन् गोविंदातील दुराव्याबद्दल म्हणाली…
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन जेवायला उत्तरेकडे तोंड करून का बसतात? हरिवंशराय बच्चन यांनी पुस्तकात लिहिलेली आठवण, म्हणालेले…
sara ali khan visited shri shailam jyotirlinga
सारा अली खानने आंध्र प्रदेशमधील ‘या’ ज्योतिर्लिंगाला दिली भेट; फोटो शेअर करत म्हणाली, “साराच्या वर्षाचा पहिला…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ
yeh jawaani hai deewani Ranbir Deepika romantic movie collection
YJHD : ११ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला रणबीर-दीपिकाचा रोमँटिक चित्रपट! फक्त ३ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

“मी जेव्हा राहाला जन्म दिला तेव्हा मी माझ्या शरीराबद्दल इतकी कठोर नव्हते. माझ्याकडे पाहून प्रत्येकाला वाटते की मी माझे वजन नैसर्गिकरित्या कमी केलेले नाही. पण राहाच्या जन्मानंतर मी स्वत:वर कोणतीही बंधन घातली नाही. त्यावेळी मला डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, तू १२ आठवड्यानंतर वर्कआऊट करु शकते. त्या वर्कआऊटमध्ये तू खूप मेहनत कर आणि मी तसेच केले”, असे आलिया म्हणाली.

“माझे वजन अजूनही पूर्ववत झालेले नाही. पण मी माझे वजन नैसर्गिकरित्याच कमी केले आहे. मी १५ मिनिटे चालणे, दीर्घ श्वास घेणे आणि व्यायाम करणे असे सर्व सुरुवातीच्या दिवसात केले. याकाळात माझ्या सासूने माझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. हे लाडू मी सहा आठवडे खाल्ले. त्यामुळे लोकांनी हे समजून घेणं गरजेचे आहे की, गरदोरपणात किंवा बाळाच्या जन्मानंतर वजन वाढणं हे जास्त खाल्ल्यामुळे होत नाही”, असा सल्लाही आलियाने दिला.

आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली. आलिया भट्टने ६ नोव्हेंबर २०२२ वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नालाही एक वर्ष पूर्ण झाले.

Story img Loader