बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. अलीकडेच दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस, मुलगी ‘राहा’सोबत साजरा केला. रणबीर-आलिया सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. आलियाने दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत तिने रणबीर कपूरबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा : ‘जवान’च्या दिग्दर्शकाने शेअर केली बाळाची पहिली झलक! पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, नाव ठेवले खूपच खास…

shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
sonalee kulkarni
“ती माझ्या पाया…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सोनाली कुलकर्णीबाबत म्हणाली…
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

मुलाखतीदरम्यान आलियाला विचारण्यात आले की, रणबीरकडे अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या तुला हेवा वाटतो? यावर आलिया म्हणाली, “रणबीरचा स्वभाव अत्यंत शांत असून तो संत प्रवृत्तीचा माणूस आहे. तो काय शांत डोक्याने विचार करतो या गोष्टीचा मला खूप हेवा वाटतो.”

पुढे आलिया स्वत:च्या स्वभावाविषयी सांगताना म्हणाली, “मी जेव्हा भडकते आणि मोठ्या आवाजात बोलते किंवा चिडचिड करते, या गोष्टी रणबीरला अजिबात आवडत नाहीत.” रणबीरला या गोष्टी आवडत नसल्याने, मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते, असेही आलियाने सांगितले.

हेही वाचा : ‘नयनतारा’बद्दल एका शब्दात काय सांगशील? शाहरुख म्हणाला, “ती अतिशय…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रणबीरचा ‘तू झुठीं में मक्कार’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात श्रद्धा कपूर रणबीरसह प्रमुख भूमिकेत होती. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच करण जौहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असेल.

Story img Loader