आलिया भट्ट सध्या तिचा प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. तसेच, ती मनोरंजनसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जातेच पण आता व्यावसायिक आघाडीवर देखील खूप सक्रिय आहे. दरम्यान, आलिया भट्टने तिच्या बँक बॅलन्सबाबत मोठा खुलासा केला आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिच्या पैशांच्या जमा खर्चाचा हिशोब कोण ठेवतं हे सांगितले तिने आहे.
हेही वाचा : जया बच्चन यांना पुन्हा एकदा राग अनावर, चाहत्यांना म्हणाल्या, “तुम्हाला लाज…”
अलीकडच्या काळात आलिया एक यशस्वी व्यावसायिक महिला म्हणूनही नावारूपास आली आहे. तिने ‘नायका’मध्ये गुंतवणूक केली आहे. यासोबतच ‘एड-ए-मम्मा’ हा लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँडही नुकताच लॉंच केला आहे. त्यासोबतच आलिया भट्ट तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या म्हणजेच ‘इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन’च्या कामकाजातही जातीने लक्ष घालते. यावरून आलिया भट्ट ही दर महिन्याला चांगले पैसे कमावते हे कळून येते.
आलिया भट्टने मुलाखतीत तिचे पैशाशी असलेले नाते गेल्या काही वर्षांत कसे बदलले, हे स्पष्ट केले आहे. आलियाने सांगितले की, तिची आई सोनी राजदानच तिच्या पैशाचा जमा खर्च ठेवत आली आहे. आलियाचा बँक बॅलन्स किती आहे हे देखील आलियाला माहीत नाही. आलिया म्हणाली, “लहानपणी माझी आई मला महिन्याला एक ठराविक रक्कम पॉकेट मनी म्हणून द्यायची. ते पैसे मी साठवून ठेवायचे आणि एखादी हटके वस्तू त्यातून विकत घ्यायचे. आताही माझी आई माझे पैसे सांभाळते.”
आणखी वाचा : “…आणि लग्नानंतर सगळंच बदललं,” रणबीर कपूरने केला आलियाशी असलेल्या नात्याविषयी खुलासा
पुढे तिने सांगितले, “माझ्या बँकेत किती पैसे आहेत याचीही मला कल्पना नाही. दरवेळी मी माझ्या टीमसोबत बसते आणि ते मला सगळे आकडे सांगत याची माहिती देतात. पण मला माहित आहे की, माझी आई माझे पैसे चांगल्या प्रकारे हाताळत आहे. त्यामुळे पैशांशी माझे असलेले नाते पैसे कमावण्याचे आहे आणि आईचे आणि पैशांचे नाते ते पैसे सांभाळण्याशी आहे.”
दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात आलिया आण रणबीर यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा पुढील भाग २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.