Alia Bhatt : जगात सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या ‘मेट गाला २०२४’ मध्ये यंदा आलिया भट्टने चक्क साडी नेसून उपस्थिती लावली होती. आलियाचा परदेशातील हा देसी अंदाज सर्वांनाच भावला होता. परंपरा जपून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्याने अभिनेत्रीचं सोशल मीडियावर देखील कौतुक करण्यात आलं होतं. नुकतीच ‘जिगरा’ चित्रपटाच्या निमित्ताने आलिया ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी अभिनेत्रीने तिचा ‘मेट गाला’चा अनुभव सांगितला.

अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता-दिग्दर्शक करण जोहर आणि ‘जिगरा’चे दिग्दर्शक वासन बाला यांनी कपिलच्या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी या तिघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. आलियाने यंदाच्या मेट गाला कार्यक्रमात तब्बल २३ फूट लांबीची साडी नेसली होती. तिच्या लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, या लूकबद्दलचा एक खुलासा अभिनेत्रीने शोमध्ये केला आहे.

हेही वाचा : आमदार धिरज देशमुखांच्या सासऱ्यांची नेटफ्लिक्सने ४७ कोटींची फसवणूक केली? ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण

आलियाने सांगितला किस्सा

आलिया ( Alia Bhatt ) म्हणाली, “माझी साडी खूपच सुंदर होती पण, असा लूक केल्यावर तुम्हाला वॉशरुमचा वापर करता येत नाही. मी स्वत: सहा तास वॉशरुमला नव्हते गेले.” ‘मेट गाला २०२४’ मध्ये आलियाने मिंट ग्रीन रंगाची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती. बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने तिच्यासाठी ही खास साडी डिझाइन केली होती.

तब्बल १६३ कारागिरांनी मिळून आलियाची ही खास साडी डिझाइन केली होती. या साडीला तयार करण्यासाठी एकूण १९६५ तास लागले होते. यावरील फ्लोरल मोटिफ वर्कमुळे ही साडी मेट गालावर अधिकच उठून दिसली. याशिवाय या साडीत सब्यसाचीने एक लाँग ट्रेल जोडली होती. यामुळे आलिया भट्टला रॅम्प वॉक करताना एकदम रॉयल लूक मिळाला. मात्र, ही लांब साडी नेसल्यामुळे इव्हेंटदरम्यान वॉशरुमला जाता आलं नाही असं आलियाने सांगितलं.

Alia Bhatt
Alia Bhatt आलिया भट्ट

हेही वाचा : आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ( Alia Bhatt ) आगामी ‘जिगरा’ चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासह वेदांग रैना प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेत्री यशराजच्या स्पाय युनिव्हर्समध्ये सहभागी झाली असून ती आणि शर्वरी प्रमुख भूमिकेत असलेला ‘अल्फा’ चित्रपट २०२५मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader