आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी सिने अवॉर्ड’ सोहळ्याला तिने हजेरी लावली होती. यावेळी परिधान केलेल्या हाय-स्लीट ड्रेसमुळे आलिया सोशल मीडियावर एकीकडे ट्रोल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तिचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती भर कार्यक्रमात सॅमसंगचा फोन मागताना दिसत आहे.
आलिया भट्टचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती सुरुवातीला फोटोग्राफर्सना पोज देते आणि नंतर अचानक एक फोटोग्राफर सर्वांबरोबर आलियाकडे सेल्फी मागतो. त्यावर आलिया त्यांना, ‘सॅमसंगचा फोन कोणाकडे आहे?’ असा प्रश्न विचारताना दिसत आहे. हे ऐकून सर्वजण हसू लागतात. एवढ्यात कोणीतरी मनोजकडे आहे असं म्हणतं. तर आलिया त्यालाही मोठ्या आवजात हाक मारते. थोड्यावेळाने तिला हवा असलेला फोन मिळतो.
आणखी वाचा- “जबरदस्तीने मांड्या दाखवून…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे आलिया भट्ट झाली ट्रोल
फोटोग्राफरचा फोन हातात घेऊन आलिया भट्ट त्यात सेल्फी कॉर्नर शोधू लागते. तिच्या या व्हिडीओवर लोक भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. काहींनी, “ही सॅमसंगचा फोन घेऊन नक्की काय करणार आहे?”, “सॅमसंगचा फोन का विचारत आहे?” अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. तर काहींनी तिची खिल्ली उडवत, “सॅमसंग आवडतो मग तू स्वतः आयफोन का वापरतेस?”, “हा तर आयफोनचा विचित्र अपमान आहे” अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा- बॉलिवूडमध्ये लवकर घटस्फोट का होतात? झीनत अमान यांनी केला मोठा खुलासा
दरम्यान २०२१ मध्ये सॅमसंगने आलियाला त्यांच्या नव्या गॅलॅक्सी जेड सीरिजची ब्रँड अँबेसिडर नेमलं होतं. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.