अभिनेत्री आलिया भट्ट व सोनम कपूर सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहेत. गेल्याच वर्षी त्या दोघीही आई झाल्या. त्यांच्याबरोबरच आलियाची लेक राहा आणि सोनमचा मुलगा वायू यांच्याकडे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधलेलं असतं. आता आलियाने सोनमच्या लेकासाठी एक खास भेट पाठवली आहे.

आलिया अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम बिझनेस वुमनही आहे. २०१२ मध्ये तिने तिचा लहान मुलांसाठी इको-कॉन्शियस कपड्यांचा ब्रॅण्ड लाईन लाँच केला होता. त्यातील कलेक्शनमधून ती इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमंडळींच्या मुलांसाठी भेटवस्तू पाठवत असते. तर नुकतीच तिने अभिनेत्री सोनम कपूरच्या मुलासाठी भेटवस्तू पाठवली आहे.

आणखी वाचा : “चित्रपट माझं पहिलं प्रेम पण…” राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टने करिअरबाबत घेतला मोठा निर्णय

सोनम कपूरने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलियाने वायूसाठी पाठवलेल्या भेटवस्तूचा फोटो शेअर केला. त्यात घराच्या आकाराची काही पर्सनलाईझ कार्ड होती, ज्यावर ‘वायू’ लिहिलं होतं. याचबरोबर एक निळा बॉक्स होता त्यात विविध रंगांचे टीशर्ट होते. त्यावर “मम्माज् बॉय” आणि “जस्ट लायन अराउंड” यांसारखे कॅप्शन दिले होते.

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

अलियाने पाठवलेली ही प्रेमाची भेट सोनमला खूपच आवडली. ही स्टोरी पोस्ट करत तिने अलियाचे आभार मानले. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या दोघींमधलं बॉण्डिंग चर्चेत आलं आहे.

Story img Loader