आलिया भट्टचा चित्रपटसृष्टीतील प्रवास, तिच्या लहानपणापासूनच्या स्वप्नांपासून ते यशाच्या मोठ्या टप्प्यांपर्यंत खूपच प्रेरणादायी आहे. आलियाला कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचे आहे, कुठला सिनेमा करायचा आहे, यावर ती नेहमीच बोलते. असाच एक किस्सा तिने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबाबत सांगितला होता. केवळ नऊ वर्षांची असताना, आलियाने भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते; जो २००५ साली प्रदर्शित झाला. त्यात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकांत होते.
२०२२ च्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आलियाने संजय लीला भन्साळींची एक आठवण सांगितली. ती म्हणाली, “मी जेव्हा नऊ वर्षांची होते, तेव्हापासून भन्साळीसरांबरोबर काम करण्याचं माझं स्वप्न होतं. मी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधीपासून ते माझ्यासाठी मोठं प्रेरणास्थान आहेत.” आलियाने तिच्या ‘ब्लॅक’च्या ऑडिशनचा अनुभव शेअर करताना सांगितलं, “मी त्यावेळी खूपच वाईट काम केलं होतं. म्हणूनच मला ती भूमिका मिळाली नाही. पण, त्यांनी तेव्हा माझ्या डोळ्यांत पाहिलं आणि ते म्हणाले, ‘ही मुलगी एक दिवस नक्कीच हिरोईन होईल.’ “
हेही वाचा…“तुम्ही मला राष्ट्रीय पुरस्कार…”, वडील महेश भट्ट यांच्याकडे आलिया भट्टने केलेली ‘ही’ मागणी
अन् भन्साळी म्हणाले…
भन्साळींनीही या आठवणींना उजाळा देत २०१९ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं, “जेव्हा आलिया नऊ वर्षांची होती, तेव्हा ती तिच्या आईबरोबर ‘ब्लॅक’साठी ऑडिशन द्यायला आली होती. मी तिच्या डोळ्यांत चमक पाहिली होती. मी तिच्या आईला सांगितलं, ‘ही मुलगी एक दिवस हिंदी चित्रपटातील मोठी हिरोईन होईल.’ ” भन्साळींचा तिच्या क्षमतेवर विश्वास होता आणि ते पुढेही तिला घेऊन काम करण्याचा विचार करीत होते.
२०१९ मध्ये जेव्हा ‘इंशाल्लाह’ या चित्रपटाची घोषणा झाली; ज्यात सलमान खान आणि आलिया मुख्य भूमिकांत होते, तेव्हा भन्साळींनी आलियाबद्दल कौतुकाने सांगितले होते, “मला या सिनेमासाठी तीच मुलगी हवी होती; पण हा प्रोजेक्ट पुढे गेला नाही. इंशाल्लाह, हा एक सुंदर प्रवास ठरेल.” ‘इंशाल्लाह’ची घोषणा झाल्यानंतर आलियाने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला होता.
दुर्दैवाने ‘इंशाल्लाह’ हा चित्रपट रद्द झाला; पण नियतीने दुसऱ्याच प्रकारे आलियाचै स्वप्न पूर्ण केलै. आलियाचै भन्साळींबरोबर काम करण्याचैनस्वप्न अखेर ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झालै. हा चित्रपट आलियाच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
हेही वाचा…४ तास विमानतळावर अडकली अभिनेत्री; संताप व्यक्त करत शेअर केली पोस्ट; म्हणाली, “मोठा गोंधळ…”
‘गंगूबाई काठियावाडी’ फक्त बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही, तर आलियाला या सिनेमाने अनेक पुरस्कार मिळवून दिले; ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे.