Jigra Trailer : आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या ‘जिगरा’ या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट आणि वेदांग रैना यात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरने आलियाच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. वासन बाला दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये आलिया एका दमदार अ‍ॅक्शन भूमिकेत दिसते, जिथे ती तिच्या भावाला वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धाडसी बहिणीच्या भूमिकेत आहे. आलिया भट्टच्या या अवताराचे बॉलीवूडमध्ये अनेक जण कौतुक करत असून तिच्या या ट्रेलरवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नीतू कपूर आणि आलियाची आई सोनी राजदान यांनीसुद्धा यावर कमेंट केल्या आहेत.

जिगरा सिनेमाचा ट्रेलर सुमारे तीन मिनिटांचा आहे आणि तो आलिया भट्टच्या सत्या नावाच्या पात्राभोवती फिरतो. सत्या तिच्या भावाला वाचवण्यासाठी एका धोकादायक प्रवासाला निघते. वेदांग रैनाने साकारलेला अंकुर हा तिचा भाऊ आहे, ज्याला चुकीच्या आरोपात अटक केली जाते आणि फाशीची शिक्षा सुनावली जाते. पोलिसांना चकवा देत आलिया गाडी चालवत आगीच्या ज्वालांमधून एका इमारतीत एंट्री करते. आपल्या हाती असलेल्या हातोड्यानं ती जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसते. इमारतींवरून उडी मारत फायटिंग करीत, भावाला वाचवण्यासाठीचे आलियाचे प्रयत्न ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहेत.

हेही वाचा…Jigra Trailer : परदेशात अडकलेल्या भावाची सुटका कशी करणार आलिया भट्ट? ‘जिगरा’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, गोष्ट आहे खूपच रंजक

नीतू कपूर यांनी आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाच्या ट्रेलर वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (आलिया भट्ट इन्स्टाग्राम पोस्ट)

आलियाच्या आईची आणि सासूबाईंची ट्रेलरवर प्रतिक्रिया

आलियाची आई सोनी राजदान यांनी आलियाच्या अ‍ॅक्शन असलेल्या जिगराच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना आउटस्टँडिंग असं म्हणत कौतुक केलं, तर सासूबाई नीतू कपूर यांनी हा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा असून खूप प्रभावी आहे, असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Neha dhupia and soni rajdan commented on alia bhatt jigra post
नेहा धुपिया आणि सोनी राजदान यांनी आलिया भट्टच्या जिगरा ट्रेलर वर प्रतिक्रिया दिली आहे. (Alia Bhatt Instagram Post)

आलिया तर लेडी बच्चन

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ट्रेलरवर नेहा धुपियाने इन्क्रीडेबल अशी प्रतिक्रिया दिली. जान्हवी कपूरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत वेदांग रैनाचं कौतुक केलं, “वेदांग, ट्रेलरमध्ये तुझी स्थिती बघून मन भरून येतंय असं म्हटलं आहे, तर तिने आलियाला लेडी बच्चन म्हणत तिचंदेखील कौतुक केलं.

jahnvhi kapoor praise alia bhatt and vedang raina for jigra trailer
जान्हवी कपूरने इन्स्टाग्राम वर स्टेटस ठेवत वेदांग रैना आणि आलिया भट्टच जिगराच्या ट्रेलरसाठी कौतुक केले आहे. (Janhvi kapoor Instagram)

हेही वाचा…लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”

आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. वासन बाला यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केल असून आलिया भट्टने करण जोहरसह या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Story img Loader