बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सतत चर्चेत असते. चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकताच ‘गंगुबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलियाला पाचवा पुरस्कार मिळाला. आलिया सध्या बऱ्याच चित्रपटांवर काम करत आहे. त्यापैकी एक ‘जी ले जरा’ या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल आलियाने मनमोकळेपणे भाष्य केले आहे.

‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट दिले. आलिया म्हणाली की, या चित्रपटातून एका नव्या विषयावर भाष्य केलं जाणार आहे अन् यासाठी ती खूप उत्सुक आहे. ती पुढे म्हणाली की “आपल्या चित्रपटक्षेत्रात महिलांच्या मैत्रीवर आधारित फारसे चित्रपट बनत नाहीत, पण आता हा चित्रपट एका नव्या युगाची सुरुवात करेल, बॉलिवूडमध्ये नव्या संकल्पनेची सुरुवात करेल, जिथे तीन आघाडीच्या महिला एकमेकांना साथ देताना दिसणार आहेत.”

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Mission Ayodhya movie
‘मिशन अयोध्या’ वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स

आणखी वाचा : ‘The kerala story’प्रमाणेच ‘ISIS Brides’बद्दल भाष्य करणारी ‘Caliphate’ ही वेबसीरिजही चर्चेत; वाचा कुठे मिळणार पाहायला?

फरहान अख्तर ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर चित्रपटाविषयी अपडेट दिले होते की, ‘जी ले जरा’ची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाची निर्माती झोया अख्तर आहे. झोयाचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडला होता, त्यानंतर प्रेक्षक तिच्या पुढच्या रोड ट्रिप चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा : Viral Video : समांथा रूथ प्रभूने का परिधान केला बुरखा? व्हायरल व्हिडीओमागील कारण जाणून घ्या

‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ या तिघी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबरोबर आलिया लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही झळकणार आहे. यात तिच्याबरोबर रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader