बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. कधी लूक, कधी स्टाईल, तर कधी दमदार अभिनयामुळे. शिवाय आलिया आपल्या युट्यूब चॅनलवर चाहत्यांसाठी स्क्रीन केअर रुटीन, चित्रपट, जाहिरात किंवा गाण्याचे मेकिंग असे बरेच व्हिडीओ पोस्ट करत असते. सध्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या तिच्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील तिच्या साड्या, तिचा लूक याविषयी बोललं जातं आहे. अशातच आलियाच्या एका व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आलिया गुरुवारी रात्री मुंबईत तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टबरोबर दिसली. त्यावेळेस तिथे पापाराझी त्या तिघींचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान शूट करताना फोटोग्राफरची एका पायातली चप्पल निघाली होती. ती चप्पल आलियानं पाहिली आणि त्यानंतर तिनं स्वतःच्या हातानं ती चप्पल उचलून त्या फोटोग्राफरच्या पायापर्यंत आणून दिली. अभिनेत्रीच्या याचं कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – “तुमच्याबरोबर काम करणं अभिमानास्पद”, शाहरुख खान दाक्षिणात्य सुपरस्टारच्या प्रेमात
हेही वाचा – टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम सुपरस्टारवरही; अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला, “आता खाण्याबाबत….”
सध्या आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या कृतीने नेटकऱ्यांची मनं तिनं जिंकली आहेत; तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “ती खूपच गोड आणि विनम्र आहे”, तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा हा नवीन मार्ग आहे.” तसेच तिसऱ्यानं लिहिलं की, “विनाकारण आलियाला लोकं ट्रोल करतात.”
हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात ‘त्या’ दोघांचीही कामगिरी महत्त्वाची; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
दरम्यान, आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गल्ली बॉय’ या चित्रपटानंतर रणवीर सिंह आणि आलिया भट्ट या दोघांची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात आलिया, रणवीर व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन व शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.