आलिया भट्टच्या गरोदरपणाच्या पहिल्या दिवसापासून चर्चा आहेत. आलिया भट्ट व रणबीर कपूर सध्या आपल्या होणाऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत आहेत. आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही काही दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाला मोजक्याच मंडळींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आलियाने सध्या कामामधून ब्रेक घेतला असला तरी अनेकदा ती रणबीर कपूर नाहीतर नीतू कपूर यांच्याबरोबर दिसते. आता काहीच दिवसात ती आई होणार आहे आणि तिला एक आदर्श आई व्हायचे आहे. त्यामुळे तिने आपल्या बाळासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “बिग बी कसे आणि तुम्ही…”, जया बच्चन यांच्यावर नेटकरी नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं

अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २०२२ हे वर्ष आलियासाठी लकी ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला तिचा ‘गंगुबाई कठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो तुफान हिट झाला. यातील आलियाच्या कामाचे खूप कौतुक केलं गेलं. त्यानंतर लगेचच तिचं रणबीरशी लग्न झालं. लग्नानंतर त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सुपरहिट चित्रपट झाला आणि आता नव्या पाहुण्याची चाहुल. या सेलिब्रिटी कपलच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : आज कोटींच्या घरात फी आकारणाऱ्या बॉलिवूड स्टार्सना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन

बाळाच्या आगमनानंतर त्याच्यासाठी आलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार आलिया २०२३ मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित तिच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत आलिया कामापासून दूर राहणार आहे. तिच्या सुट्टीचा हा काळ जवळपास वर्षभराचा असेल. याआधी रणबीरनेही बाळासाठी तो ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तो त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. रणबीर पाठोपाठ आता आलियाही पुढील वर्षी सुट्टी घेणार असल्याने ते दोघे बाळाचा किती विचार करत आहेत हे पुन्हा एकदा समोर आले आहे.