आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलब्रिटी जोडपे आहे. अनेकदा ते त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांची मुलगी राहा ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकताच आलियाने तिचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर या आलिया-रणबीरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यादरम्यानच, त्यांच्या एका जुन्या मुलाखतीची चर्चा होताना दिसत आहे, ज्यामध्ये आलियाने तिच्यासाठी प्रेमाचा नेमका अर्थ काय आणि कोणत्या माणसाशी ती कधीच लग्न करण्याचा विचार करणार नाही, यावर तिने तिचे मत मांडले होते.

इम्तियाज अली यांच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसला होता; तर इम्तियाज अली दिग्दर्शित ‘हायवे’ चित्रपटात आलिया भट्टने प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. याचदरम्यान इम्तियाज अली, रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या संवादाचा एक व्हिडीओ पाहायला मिळाला होता. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यावेळी रणबीरने इम्तियाज अली यांना जर तुम्हाला आलिया आणि मला घेऊन एखादा चित्रपट बनवायचा असेल, तर तो कोणता असेल? कोणत्या चित्रपटांचा रिमेक वगैरे असेल का? असे विचारले होते. त्यावर बोलताना इम्तियाज अली यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली होती. ती अशी की, एक मुलगा, जो वागण्या-बोलण्यात चांगला नाहीये, जो लोकांना दु:ख पोहोचवतो आणि एक अशी मुलगी, जिला फक्त चांगले लोक हवे आहेत. तिला तिच्या आयुष्यात चांगला मुलगा हवा आहे. त्यांच्यात रिलेशनशिप असेल; पण तो मुलगा तिला भावनिकरीत्या दु:ख पोहोचवतो. कारण- तो मुलींशी किंवा इतरांशीदेखील तसाच वागतो. त्या मुलाच्या आयुष्यात काहीतरी वाईट झालेले असते, अशा आशयाची गोष्ट इम्तियाज अली यांनी सांगितली होती.

आलिया भट्टने काय म्हटले होते?

पुढे इम्तियाज अली यांनी त्यांना लिहिण्यापेक्षा दिग्दर्शन करायला आवडते. तेथे रणबीरने अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करायला आवडेल, असे म्हटले होते; तर आलिया भट्टने, मला फक्त अभिनय करायला आवडेल, असे म्हटले होते. पुढे रणबीरने आलियाला विचारले की, तुझे प्रेमाबाबत काय मत आहे? सध्या तू त्या मुलींपैकी एक आहेस, ज्यांना त्यांचं करिअर खूप महत्त्वाचं आहे. त्यावर आलिया भट्टने म्हटलेले, “मी असा कधीच दावा केला नाही आणि याआधी मी कधीच प्रेमात पडले नाहीये.”

पुढे रणबीरने आलियाला विचारले की, तू अभिनय क्षेत्रात काम करू नये, असे वाटणाऱ्या व्यक्तीशी तू लग्न करशील का? यावर उत्तर अभिनेत्रीने म्हटलेले, “नाही. कदाचित मी आयुष्यभर अभिनय करणार नाही. पण, मला जोपर्यंत मला आवडेल तोपर्यंत मी अभिनय करू इच्छिते. जर एखाद्या व्यक्तीला मी हे करू नये, असे वाटत असेल. तर ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात नको आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती हवी आहे, ती मी नाहीये. माफ करा”, असे उत्तर दिले होते.

दरम्यान, रणबीर-आलियाच्या या संवाद झाल्यावर त्यांनी दशकानंतर लग्नगाठ बांधली. त्यांना राहा ही मुलगीदेखील आहे. रणबीर-आलियाने ब्रह्मास्त्र या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले. त्यांच्या कामाबाबत बोलायचे, तर रणबीर याआधी अॅनिमल या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता; तर आलियाने ‘जिगरा’ या चित्रपटात काम केले होते. आता ते संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामध्ये विकी कौशलदेखील प्रमुख भूमिकेत दिसला होता.