बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट हिचे नाव घेतले आहे. आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून २०१२ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या १० वर्षांच्या काळात आलियाने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली असून काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टचे नाव ‘गुची’ या ग्लोबल ब्रँडसाठी, वर्ल्ड ब्रँड अंबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. अंबेसेडर झाल्यावर अलीकडेच या अभिनेत्रीने ‘गुची’ ब्रॅंडच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यावेळी आलियाने लैंगिक समानता या विषयावर आपले मत मांडले हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : Video : “भाभी का ट्रेलर आया है” पापाराझींनी चिडवल्यावर सिद्धार्थ मल्होत्रा लाजला अन्…; व्हिडीओ व्हायरल
गुची ब्रॅंडच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्टने लैंगिक समानता या विषयावर भाष्य केले. यावरून नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक युजर्सला आलियाने उत्स्फूर्तपणे संवाद न साधता केवळ लिहून दिलेली स्क्रिप्ट पाठ केली आहे असे वाटते आहे. तिच्या भाषणात आलिया म्हणते, “जर एखादी महिला सक्षम असेल, तर ती संपूर्ण घरात, तिच्या मुलांसाठी, समाजासाठी आणि अर्थात देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
आलिया भट्टचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, “आलिया खूप छान रट्टा मारतेस”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “चांगली रिहर्सल केलीस, पण आत्मविश्वासाची कमी जाणवली.” काहींनी “बोलताना मोठे शब्द वापरले म्हणजे तुम्ही समजूतदार नाही होत आलिया, तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये” अशा कमेंट केल्या आहेत.
आलिया भट्ट इंटरनेटवर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वीही अभिनेत्रीने परिधान केलेल्या एका टी-शर्ट ब्रॅंडमुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आलियाबरोबर रणवीर सिंह महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.