अभिनयाबरोबरच बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता निर्माती आणि गुच्चीची (GUCCI) जागतिक ब्रँड ॲम्बेसेडरसुद्धा आहे. सध्या मुंबईतल्या एका गुच्चीच्या इव्हेंटमुळे आलिया चर्चेत आहे. इतर बॉलीवूड स्टार्सबरोबर गुच्ची ब्रँडच्या एका कार्यक्रमात आलिया सहभागी झाली होती. परंतु, या कार्यक्रमातील आलियाच्या लूकमुळे रेडिटवरचे चाहते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी पार पडलेल्या गुच्चीच्या कार्यक्रमासाठी आलियाने काळ्या रंगाचा ब्लेझर सेट आणि काळ्या रंगाच्या डिझायनर बॅगची निवड केली होती. परंतु, या बॅगमुळे आलिया आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… नववधू पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनिमूनला, व्हिडीओ व्हायरल

एका रेडिट युजरने आलियाच्या बॅगबद्दल माहिती काढली. त्या माहितीनुसार आलियाची बॅग २८०० डॉलर्सची असून गायीच्या वासराच्या कातड्यापासून बनवली आहे. याबाबतची पोस्ट संबंधित युजरने त्याच्या रेडिट अकाउंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियाच्या फोटोबरोबर त्या बॅगेची रक्कम आणि माहिती दिली आहे. या माहितीमध्ये ‘ब्लॅक लेदर (काल्फ)’ असे नमूद केले आहे. पुढे इंटरनेटवर शोधलेल्या माहितीचा स्क्रीनशॉर्ट टाकून या युजरने काल्फ स्किन लेदरबद्दल माहिती दिली आहे. हे ‘काल्फ स्किन लेदर’ तीन वर्षांखालील वासरापासून बनवले जात असल्याचे यात सांगण्यात आलं आहे.

रेडिटवरील या पोस्टमुळे आलियाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “ढोंगीपणा सुरू आहे नुसता.” तर दुसऱ्याने लिहिले, “पोचर चित्रपटाच्या प्रमोशननंतर तरी आलियाने अशी बॅग न्यायला नको होती.” ही रेडिट पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा… डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीने शेअर केलेला अनंत अंबानींच्या प्री-वेडींगमधील फोटो पाहून भडकली अर्शद वारसीची पत्नी, म्हणाली…

दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ‘पोचर’ या सीरिजद्वारे आलियाने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे, तर ‘जिगरा’ या आगामी चित्रपटात ती लवकरच झळकणार आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.