अयोध्येतील श्री राम मंदिरात आज (२२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले होते. बॉलीवूडमधील बहुतांश कलाकारांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हायची संधी मिळाली. माधुरी दीक्षित-श्रीराम नेने, विकी कौशल-कतरिना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर अशा बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्यांना यावेळी निमंत्रित करण्यात आलं होतं. रामल्लाची प्रतिष्ठापना झाल्यावर मंदिर परिसरातील अनेक फोटो सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सगळ्या बॉलीवूड सेलिब्रिटींनी पारंपरिक पोशाख केला होता. रणबीर कपूरने धोतर, तर आलियाने मोरपिशी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. या सोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास साडीची निवड केली होती.

हेही वाचा : Video : “पहिल्या पायरीपासून ते २१ मजले…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेने बॉयफ्रेंडसह दाखवली नव्या घराची झलक

सध्या आलिया भट्टने नेसलेल्या साडीची बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिच्या संपूर्ण प्लेन डिझाइन असलेल्या साडीच्या काठावर रामायणासंदर्भातील चित्र रेखाटण्यात आली आहेत. तसेच या चित्रांमध्ये रामायणातील विविध प्रसंग पाहायला मिळत आहेत. या साडीवर आलियाने खास शाल परिधान केली होती. तिच्या या साध्या व सुंदर लूकने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : अयोध्येत कलाकारांची मांदियाळी! माधुरी दीक्षितच्या पतीने बॉलीवूडकरांसह काढला सेल्फी, फोटो व्हायरल

दरम्यान, प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. आज प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली होती. बॉलीवूडच्या या लोकप्रिय जोडप्यांशिवाय या सोहळ्याला रजनीकांत, अमिताभ व अभिषेक बच्चन, आयुष्मान खुराना, श्लोका व आकाश अंबानी, कंगना हे कलाकार देखील सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt wears special saree for ram mandir ceremony photos viral sva 00