हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आज त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. वाढदिवसानिमित्त नीतू कपूर यांना बॉलीवूड कलाकार तसेच कपूर कुटुंबीयांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. लाडक्या सासूच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने सुद्धा खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा : “स्वच्छतागृह नसल्याने दिवसभर…” रेणुका शहाणेंनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा; म्हणाल्या, “माधुरी दीक्षितने फार सांभाळले”

Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

आलिया भट्ट आणि नीतू कपूर या दोघीही एकमेकींचे अनेकदा कौतुक करताना दिसतात. “आलिया माझी सून नाही मुलगी आहे.” असे नीत कपूर यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सासूच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आलियाने खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “ओटीटीवर फक्त समलैंगिकता, गे-लेस्बियन सीरिज…”, ‘गदर २’च्या प्रमोशनदरम्यान अमीषा पटेलने केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

आलिया फोटो शेअर करत लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्वीन…तुम्ही सुंदर आहात, प्रत्येक गोष्ट सुंदर बनवता, आय लव्ह यू खूप खूप प्रेम.” आलिया भट्टप्रमाणे नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धीमाने सुद्धा आईच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण कुटुंबाचा खास फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी जनतेची मागितली जाहीर माफी; म्हणाले, “मी हात जोडून…”

रिद्धीमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये नीतू खुर्चीवर बसल्या असून, यामध्ये रणबीर कपूर, रिद्धीमासह तिचा पती भरत साहनी आणि मुलगी अनायरा दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये रिद्धीमा लिहिते, “आई…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तू आमच्या कुटुंबाचा एक आधार आहे. आलिया तुला आणि बेबी राहाला आम्ही प्रचंड मिस करत आहोत.”

नीतू कपूर सध्या इटलीमध्ये कुटुंबीयांबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तिथेच त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी रणबीर कपूर आईच्या वाढदिवसाला उपस्थित होता. मात्र, आलिया भट्ट कामानिमित्त सासूच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकली नाही.

Story img Loader