बॉलीवूडमधील कलाकार हे अनेकदा त्यांच्या चित्रपटांमुळे मोठ्या चर्चेत असतात. अनेकदा मुलाखतींमध्ये केलेली त्यांच्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसते. कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो किंवा पोस्टदेखील चर्चांचे विषय ठरताना दिसतात. त्याबरोबरच या कलाकारांचे जितके चाहते असतात, तितकेच त्यांच्या मुलांचेदेखील चाहते असल्याचे पाहायला मिळते. करीना कपूर खान व सैफ अली खान यांची तैमूर व जेह ही मुले असोत किंवा दीपिका पदुकोणची नुकतीच जन्मलेली लेक दुआ असो; चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. या सगळ्यात रणबीर कपूर(Ranbir Kapoor) व आलिया भट्ट(Alia Bhatt) यांची मुलगी राहा(Raha Kapoor) वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी राहा त्यांना काय म्हणून हाक मारते, याबद्दल खुलासा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा