Rahul Bhatt on Ranbir Kapoor: रणबीर कपूर व आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी आहे. रणबीर कपूर व आलिया दोघेही यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते त्यांची मुलगी राहामुळेदेखील चर्चेत असतात.

रणबीर कपूरबाबत राहुल भट्ट काय म्हणाला?

आता अभिनेता व फिटनेस ट्रेनर राहुल भट्टने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. राहुल भट्ट हा आलिया भट्टचा सावत्रभाऊ आहे. महेश भट्ट व त्यांची पहिली पत्नी किरण यांचा तो मुलगा आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या भावंडांशी असलेले संबंध, पालक यांच्याबाबत वक्तव्य केले. तसेच त्याने आलिया भट्टचा पती व अभिनेता रणबीर कपूर यांच्याबाबतही वक्तव्य केले आहे.

राहुल भट्ट म्हणाला, “रणबीर उत्तम पिता आहे. त्यामुळे मला त्याच्याविषयी आदर वाटतो. मला त्याच्या अभिनयाबद्दल फारसे माहीत नाही. कोण कपूर, कोण अभिनेता, कसला अभिनय, कोणता अॅनिमल चित्रपट यानं मला फरक पडत नाही. तो वडील म्हणून उत्तम आहे. तो त्याच्या मुलीवर खूप प्रेम करतो, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी कशाचा मला फरक पडत नाही.”

पुढे राहुल भट्ट म्हणाला, “प्रसिद्धी, पैसे, यश या गोष्टी येतात आणि जातात. पण, जेव्हा तुम्ही रणबीर कपूरकडे माणूस म्हणून बघता, तेव्हा तो उत्तम व्यक्ती असल्याचं कळतं. तो माझ्या बहिणीचा आदर करतो. हे पुरेसं आहे. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात.”

अॅनिमल या चित्रपटाच्या वेळी रणबीर कपूरने ट्रेनिंगसाठी तुझ्याशी संपर्क साधला होता का? यावर राहुल भट्ट म्हणाला, “तो स्वत:च स्वत:ला ट्रेन करतो. तो त्याच्या कामाप्रति समर्पित आहे. तो खूप चांगले प्रश्न विचारतो”, असे म्हणत राहुल भट्टने अभिनेत्याचे कौतुक केले.

दरम्यान, आलिया भट्ट व रणबीर कपूरची लेक राहा सातत्याने चर्चेत असते. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आलिया-रणबीर कपूरची दोन वर्षांची लेक राहाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळते. काही दिवसांपूर्वीच आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर राहाने तिच्यासाठी जेवण बनवले, असा फोटो शेअर केला होता. खेळण्यातील कणकेपासून राहाने वेगवेगळे पदार्थ बनवल्याचे आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळाले.