‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून आमिर खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आमिरच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. गायिका अलका याज्ञिकने आमिर खानशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.
हेही वाचा- “माझी प्रेमकथा माझ्याबरोबर कबरीत जाईल”; अखेर सलमान खान असं का म्हणाला?
अलका याज्ञिकने ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. जेव्हा अलका याज्ञिक या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमिर खानला खोलीतून बाहेर काढले होते. नंतर त्यांनी आमिर खानची माफीही मागितली होती. अलका म्हणाल्या, मला आठवतं, मी ‘गजब का है दिन…’ गाणे रेकॉर्ड करीत असताना आमिर खान माझ्यासमोर बसला होता. तो तेव्हा नवीन होता, त्यामुळे मी त्याला ओळखत नव्हते. मला वाटले की तो एक चाहता आहे. म्हणून मी खूप प्रेमाने त्याला खोलीतून बाहेर जायला सांगितले.
अलका याज्ञिक पुढे म्हणाल्या, “गाणे रेकॉर्ड केल्यानंतर मन्सूर खानने माझी आमिर खानशी ओळख करून दिली आणि तो चित्रपटाचा नायक असल्याचे सांगितले. मला खूप लाज वाटली आणि लगेच मी त्याची माफी मागितली. आमिर हसला आणि म्हणाला, ‘काही हरकत नाही मॅडम.’ मला हा प्रसंग चांगलाच आठवतो.”
गेल्या वर्षी, आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. सोशल मीडियावर बॉलीवूडच्या बॉयकॉट ट्रेण्डनंतर आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला. आता चाहत्यांना आमिर खानच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. मात्र आमिरने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.