Pushpa 2 The Rule : सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांचा ‘पुष्पा २’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट पाहण्यासाठी व्यक्ती चित्रपटगृहांबाहेर गर्दी करतायत. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत आहे. ४ डिसेंबरला हैदराबाद येथे चित्रपटाच्या प्रीमियरला मोठी दुर्घटना घडली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता आंध्र प्रदेशमध्ये चित्रपट पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

कल्याणदुर्गमचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) रवी बाबू यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ही ३५ वर्षीय व्यक्ती सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मृतावस्थेत आढळली. चित्रपटगृहामध्ये सफाई कर्मचारी चित्रपट संपल्यावर साफसफाई करत होते. त्यावेळी त्यांना हा मृतदेह दिसला. मृत व्यक्तीला चार मुले आहेत. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी येण्याआधीच त्याने मद्य प्राशन केले होते. त्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास चित्रपटगृहामध्ये आल्यावरसुद्धा त्याने जास्त मद्य प्राशन केले. मृत्यूचे नेमके कारण काय ते अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मृत्यू नेमका कधी झाला हे समजलेले नाही. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांना सायंकाळी ६ वाजता हा मृतदेह आढळला, असे पोलिसांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे.

प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”

संध्या चित्रपटगृहामध्ये प्रीमियरवेळी महिलेचा मृत्यू

४ डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रीमियरला मोठी गर्दी झाली होती. येथे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासुद्धा उपस्थित राहिले होते. आवडत्या कलाकारांना एकदा तरी पाहता यावे यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी येथे चेंगराचेंगरी झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. ही महिला तिचा पती आणि दोन लहान मुलांसह आली होती. तिच्या मृत्यूसह लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : “मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…

पाटणाच्या ट्रेलर लाँचवेळीही जमली होती गर्दी

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पाटणाच्या गांधी मैदान येथे १७ नोव्हेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. त्यावेळीही प्रचंड गर्दी जमली होती. नुकतीच या गर्दीची तुलना दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने जेसीबीचे काम पाहण्यासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीशी केली.

अल्लू अर्जुनकडून चाहत्यांना आवाहन

हैदराबादमध्ये महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेवर अल्लू अर्जुनने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात त्याने सर्व चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी येताना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. “प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतात तेव्हा त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी”, असं अल्लू अर्जुन म्हणाला होता.

D

Story img Loader