Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता त्याच्या ‘पुष्पा २’ चित्रपटामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. फार कमी दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी रेकॉर्ड बनवला आहे. चित्रपटाच्या यशामुळे अल्लू अर्जुनला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चहूबाजूने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अल्लू अर्जुन कुठे येणार असेल तर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनसाठी जमणारी गर्दी आणि त्याच्यावर असलेलं प्रेम पाहून तो राजकारणात सहभागी होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या अफवेला आता उधाण आलं आहे, त्यामुळे यावर अल्लू अर्जुनच्या टीमकडून अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे. चला तर मग या स्पष्टीकरणात नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ.

हेही वाचा : मी चित्रपटात करिअर करू शकलो नसतो तर…; अमिताभ बच्चन यांच्यासमोर काय म्हणाले नाना पाटेकर?

अल्लू अर्जुनच्या टीमचे अधिकृत स्पष्टीकरण

टीम अल्लू अर्जुन या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमांना विनंती करत लिहिण्यात आलं आहे, “आम्ही सर्व पत्रकार आणि वृत्तसंस्थांना विनंती करत आहोत की, कृपया असत्य असलेली माहिती पसरवू नका. अचूक आणि योग्य माहिती आम्ही या अधिकृत अकाउंटवर दिली आहे, माहिती देण्यासाठी याचाच आधार घ्या.”

तसेच या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अल्लू अर्जुन राजकारणात प्रवेश करणार ही अफवा अत्यंत खोटी आणि निराधार आहे, त्यामुळे खोटी माहिती कोणीही पसरवू नये. तसेच खऱ्या आणि अचूक अपडेटसाठी अल्लू अर्जुनच्या अधिकृत टीमच्या विधानाचा आधार घ्यावा.”

हेही वाचा : “एक ठरवलंय या वाढदिवसाला…”, उमेश कामत काय म्हणाला? पत्नी प्रिया बापटने शेअर केला व्हिडीओ

अल्लू अर्जुन गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाला होता. येथे त्याने चित्रपटाच्या यशाबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली आहे. यावर बोलताना तो म्हणाला, “समोर येणारे आकडे हे तात्पुरते आहेत. मात्र, चाहत्यांचं प्रेम कायमचं मनावर कोरलं गेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की, मोठ मोठे विक्रम हे मोडण्यासाठीच तयार होतात. सध्या मी शीर्षस्थानी आहे. मात्र, पुढील दोन ते तीन महिन्यांत हा रेकॉर्डसुद्धा मोडला जाईल. मग तो दाक्षिण्य किंवा हिंदी अशा कोणत्याही चित्रपटाने मोडावा, ही आपली प्रगती आहे; याचा अर्थ असा होतो की, भारत पुढे जात आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun official team clarification on rumours of actor entering politics rsj