Alpha Release Date : यशराज फिल्म्सच्या (YRF) बहुचर्चित ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये आता एका नव्या सिनेमाचा समावेश होणार आहे. ‘अल्फा’ असे या नव्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट विशेष ठरणार आहे कारण यामध्ये पहिल्यांदाच दोन महिला एजंट्सची प्रमुख पात्रे असणार आहेत. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या दोन सुपर एजंट्सच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट सध्या चर्चेत असून चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अल्फा’ हा यशराजच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला स्त्री-प्रधान चित्रपट आहे. यापूर्वीच्या ‘टायगर’, ‘पठाण’ आणि ‘वॉर’ सारख्या लोकप्रिय चित्रपट मालिकांच्या यशानंतर ‘अल्फा’मध्ये स्त्री पात्रांचा प्रमुख सहभाग दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक नवीन अनुभव घेऊन येईल कारण यात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या दोघी सुपर एजंट्सच्या भूमिकेत दिसतील, ज्या विविध अ‍ॅक्शन आणि थरारक घटनांचा सामना करणार आहेत.

हेही वाचा…पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

‘या’ तारखेला येणार ‘अल्फा’ प्रेक्षकांच्या भेटीला

यशराज फिल्म्सने नुकतीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, “२०२५ च्या ख्रिसमसला अल्फा प्रेक्षकांच्या भेटीला येणार! एक थरारक आणि अ‍ॅक्शनने भरलेला सण अनुभवण्यासाठी सज्ज व्हा… २५ डिसेंबर २०२५.”

“मुंबईतील सेटवर आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या सिनेमाचं चित्रीकरण करणार आहेत. या सिनेमाच्या काही महत्त्वपूर्ण अ‍ॅक्शन सीनसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. या सीनसाठी आलिया आणि शर्वरी दोघी खूप मेहनत घेत आहेत आणि या अ‍ॅक्शन सीन्सना योग्य ते टच देण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत. चित्रपटाच्या या शेड्यूलमध्ये त्यांना १५ दिवस सतत शारीरिक आव्हानं पार करावी लागणार आहेत”, अशी माहिती ई-टाइम्सने सूत्राच्या हवाल्याने दिली आहे.

हेही वाचा…अमिताभ बच्चन यांनी एकाच दिवशी ओढल्या होत्या २०० सिगारेट्स; व्यसनाबद्दल बिग बी म्हणालेले, “जे मिळेल ते…”

‘अल्फा’ चं चित्रीकरण जुलै २०२४ पासून सुरू झालं असून, आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी त्यांच्या भूमिकांसाठी कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचाही समावेश आहे. ‘अल्फा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव राविल करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alphaa alia bhatt and sharvari wagh set to star as super agents in yrf spy universe psg