कपूर घराणे बॉलिवूडमधील प्रख्यात असे कुटुंब, या कुटुंबातील पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूरपर्यंत सगळ्या सदस्यांनी चित्रपटसृष्टीसाठी मोठं योगदान दिल आहे. अभिनेते रणधीर कपूर यांची ज्येष्ठ कन्या करिष्मा कपूर अधूनमधून चर्चेत असते. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. सोशल मीडियावरदेखील ती सक्रिय असते. करोना काळात तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक जुने फोटो शेअर केले होते. नुकताच तिने एक क्रॉप टॉपमधला फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच तरुण दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिष्मा कपूरने हा फोटो टाकताच नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे फक्त नेटकरी नव्हे तर बॉलिवूड सेलेब्रेटींनीदेखील तिच्या फ़ोटोंवर कॉमेंट्स करण्यात सुरवात केली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या फोटोवर कॉमेंट केली आहे ज्यात तिने लिहले आहे, ‘नेहमीच थक्क करणारी ‘आणि हार्ट ईमोजीदेखील कॉमेंटमध्ये दिला आहे. अमृता अरोरानेदेखील ‘एकसारखी दिसत आहेस’ अशा शब्दात तिने कॉमेंट केली आहे. करिष्मा कपूरच्या भावाने तिला तू पंचवीस वर्षांची दिसत आहेस अशी कॉमेंट केली आहे.

आजची तरुणाई, बोल्डनेस अन् लग्नव्यवस्थेतील किचकट प्रक्रिया; ‘३६ गुण’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

करिष्माने वयाच्या १६ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १९९१ साली ‘प्रेमकैदी’ चित्रपटातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. ‘जुडवा’, ‘कुली’ , ‘अंदाज अपना अपना’, ‘दिल तो पागल हैं’ यांसारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. आजही तिच्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनेता गोविंदांबरोबर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘राजा हिंदुस्थानी’ हा तिचा गाजलेला चित्रपट होता.

करिश्मा कपूरचं याआधी दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूर याच्याशी २००३ मध्ये लग्न झालं होतं. या लग्नापासून तिला मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये या दोघांचं नातं संपल्याचं जाहीर झालं आणि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. करिश्मा कपूरने आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Always a stunner says anushka sharma as karisma kapoor stuns in a white crop top spg