नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान याने काही महिन्यांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारवरील मालिका ‘द ट्रायल’मध्येही प्रमुख भूमिका साकारली होती. एका मुलाखतीत त्याने शोमधील त्याची सह-अभिनेत्री काजोलसोबतच्या किसिंग सीनबाबत भाष्य केलं. अलीने सांगितलं की त्याने आपल्या पत्नी आणि मुलीबरोबर हा सीन पाहिला होता.

एका मुलाखतीत काजोलने या शोसाठी तिची ‘नो-किसिंग पॉलिसी’ मोडल्याबद्दल अलीला विचारण्यात आलं. तो म्हणाला, “तिची अशी पॉलिसी आहे, याची मला कल्पना नव्हती. याआधी मी काजोलला ओळखत नव्हतो. जेव्हा मी स्क्रिप्ट्स वाचल्या तेव्हाच मला त्यात एक किसिंग सीन असल्याचं समजलं.” सेटवर हा किसिंग सीन म्हणजे काही फार मोठी गोष्ट नव्हती, असंही त्याने सांगितलं.

‘सीता और गीता’मधील ‘ती’ हेमा मालिनी नव्हेच! रोहित शेट्टीने केला गौप्यस्फोट, म्हणाला, “पंख्यावर बसलेली दिसतेय ती…”

अली पुढे म्हणाला, “विशेष म्हणजे मी माझ्या पत्नीला या सीनबाबत सांगितलं होतं. आम्ही थायलंडमध्ये सुट्टीवर होतो. आम्ही शो बघायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या पत्नीसोबत सोफ्यावर बसलो होतो आणि माझी मुलगी दुसऱ्या सोफ्यावर बसली होती. किसिंग सीन आला आणि गेला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं आणि आम्ही शो पाहत राहिलो इतकंच. हे माझे वडील आहेत किंवा हा माझा नवरा आहे, असा विचार कोणीही करत नव्हतं, कोणीही हसलं नाही. प्रेक्षक म्हणून त्यांनी शो पाहिला.”

आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

दरम्यान, आधी दिलेल्या एका मुलाखतीत इंटिमेट सीन शूट करताना काजोलचा पती अजय देवगण सेटवर उपस्थित नव्हता, असं अलीने सांगितलं होतं. “शोमध्ये मी तिच्या प्रियकराची, तिच्या बॉसची भूमिका करतो, आमच्यात एक फ्रेंच किसचा सीन आहे. आम्ही कॉलेजमध्ये प्रेयसी-प्रियकर होतो. नंतर पुन्हा आमचा रोमान्स सुरू होतो, असा सीन आहे. आता हे आमचं काम असल्याने करावं लागतं. खरं तर सीन शूट करताना माझ्या तोंडात च्युइंग गम होती. काजोलच्या पतीचे म्हणजेच अजय देवगणचे प्रॉडक्शन होते. तो त्या दिवशी सेटवर आला नव्हता. आम्ही मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्ये शूटिंग करत होतो. या सीनसाठी फक्त मोजकेच लोक सेटवर होते,” असं अली म्हणाला होता.