अभिनेत्री काजोल ‘द गुड वाईफ’ या सुपरहिट शोच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर सहकलाकार, ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खानचीही महत्त्वाची भूमिका आहे. तो शोमध्ये काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारणार आहे. यामध्ये दोघांचा एक इंटिमेट सीन होता. नुकतंच अलीने त्या इंटिमेट सीनबद्दल भाष्य केलं. तसेच आपल्याला काजोलवर क्रश होता, अशी कबुलीही त्याने दिली.
तमन्ना भाटियाला डेट करण्याबद्दल विजय वर्माने सोडलं मौन, ट्वीट करत म्हणाला…
नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये अलीने त्याचा आगामी चित्रपट ‘द आर्चीज’चे काही मजेदार किस्सेही सांगितले. यावेळी त्याला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अली म्हणाला, “मी लहान होतो तेव्हा माझी आवडती अभिनेत्री काजोल होती. मी तीन दशकांपासून तिचे काम पाहत आहे; आम्ही एकत्र कामही केलंय. मी ऐकलं होतं की ती खूप रागीट आहे. पण, मी तिच्याबरोबर एका शोचं शूटिंग पूर्ण केलंय, ज्यामध्ये मी तिच्या प्रियकराची भूमिका करत आहे. आमच्यात एक किसिंग सीनही आहे.”
इंटिमेट सीनच्या शूटिंगच्या दिवशी काजोलचा पती अजय देवगण सेटवर उपस्थित नव्हता, असं सांगत अली पुढे म्हणाला, “शोमध्ये मी तिच्या प्रियकराची, तिच्या बॉसची भूमिका करतो, आमच्यात एक फ्रेंच किसचा सीन आहे. आम्ही कॉलेजमध्ये प्रेयसी-प्रियकर होतो. नंतर पुन्हा आमचा रोमान्स सुरू होतो, असा सीन आहे. आता हे आमचं काम असल्याने करावं लागतं. खरं तर सीन शूट करताना माझ्या तोंडात च्युइंग गम होती. काजोलच्या पतीचे म्हणजेच अजय देवगणचे प्रॉडक्शन होते. तो त्या दिवशी सेटवर आला नव्हता. आम्ही मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्ये शूटिंग करत होतो. या सीनसाठी फक्त मोजकेच लोक सेटवर होते. मी हा किसिंग सीन कसा करेन, ते मी दिग्दर्शक आणि काजोल दोघांनाही सांगितलं. पण हा सीन शूट करताना मला लाज किंवा संकोच नव्हता. अभिनय करणं आमचं काम आहे, हे पूर्णपणे प्रोफेशनल शूटिंग होतं. आम्ही तीन किंवा चार वेळा प्रॅक्टिस केली आणि नंतर फायनल सीन शूट केला. सीन शूट झाल्यावर काजल मला ‘थँक्यू माय डार्लिंग’ असं म्हणाली.”
‘द गुड वाईफ’ शोच्या रिमेकची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. मूळ शोमध्ये ज्युलियाना मार्गुइल्स मुख्य भूमिकेत होती. या शोचे जपानी आणि दक्षिण कोरियन रिमेक आधीच तयार केले गेले आहेत आणि हिंदी व्हर्जनमध्ये कुब्बरा सैत आणि शीबा चड्ढा देखील आहेत.