देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. गुजरात येथील जामनगरमध्ये अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्चपर्यंत मोठ्या धूमधडाक्यात झाला. सध्या यासोहळ्यातील न पाहिलेल्या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत. राधिका मर्चंट व शाहरुख खानचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत, अंबानींची ही धाकटी सून किंग खानला ‘अंकल’ म्हणताना दिसत आहे.

राधिका मर्चंट व शाहरुख खानचा हा व्हिडीओ ‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला राधिका म्हणाली, “शाहरुख अंकल, तुम्ही इथे आहात त्यामुळे आज मी तुमच्या चित्रपटातला एक डायलॉग म्हणते.” यावर शाहरुख म्हणतो, “जर अक्षय असता तर अक्षय कुमारच्या चित्रपटातला डायलॉग म्हणाली असतीस ना.” यानंतर सगळे हसू लागतात. मग शाहरुख म्हणतो, “अक्की हे मी प्रेमाने बोलतोय. ठीक आहे, माझ्या चित्रपटातला प्रेमाचा डायलॉग म्हण.” त्यानंतर राधिका म्हणाली, “मी थोडी घाबरली आहे.” यावर शाहरुख म्हणतो, “घाबरण्याची काही गरज नाही.”

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….

हेही वाचा – Video: अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा शाहरुख खानसह ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “राधिका…”

मग राधिका शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील डायलॉग अनंत अंबानींसाठी म्हणते. ती म्हणते, ‘इतनी शिद्दत से मैंने तुझे पाने की कोशिश की है कि जर्रे-जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.’ राधिकाचा हा डायलॉग ऐकून अनंत तिला मिठी मारतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – मुनव्वर फारुकीला गँगस्टर म्हणत ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाने दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला, “तुला दाखवतो…”

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, करिना कपूर, सैफी अली खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, जान्हवी कपूर, सोनम कपूर, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, टायगर श्रॉफ, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनाली बेंद्रे, नताशा पूनावालासह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.

Story img Loader