देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात अनंत राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. त्याआधी काही दिवसांपूर्वी अनंत व राधिकाचा तीन दिवसांचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत झालेल्या या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते. अजूनही या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. अशातच अंबानींची होणारी सून राधिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती ओरीसह गरबा खेळताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: सावनी मुक्ताला देणार चॅलेंज, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात काय घडणार? जाणून घ्या…

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

राधिका मर्चंट व ओरीचा हा व्हायरल व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या एंटरटेनमेंट पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राधिका व ओरी गरबा खेळताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले.

हेही वाचा – सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई जुळ्या मुलांना देणार जन्म? वडिलांनी पोस्ट करत सांगितलं सत्य, म्हणाले…

त्यानंतर, तिसऱ्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. याशिवाय अरिजीत सिंह, लकी अली, श्रेया घोषालसह बऱ्याच लोकप्रिय गायकांचा परफॉर्मन्स झाला.

Story img Loader