दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच अभिनेत्री अमीषा पटेलने ‘बॉलीवूड हंगामाला’ दिलेल्या मुलाखतीत ‘गदर’ च्या पहिल्या भागाबाबत अनेक खुलासे केले आहे.
‘गदर’च्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. त्यांच्याविषयी सांगताना अभिनेत्री अमीषा पटेल म्हणाली, “दिग्दर्शक अनिल शर्मांचे सेटवर काम करताना वेळेकडे अजिबात लक्ष नसते, ते सलग शूटिंग करतात. ‘गदर’च्या सेटवर आम्ही अनेकदा सलग ३० ते ३२ तास काम केले आहे.”
हेही वाचा : Video : दीपाली सय्यद यांनी भर पावसात भाजले मक्याचे कणीस, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या “१० रुपये…”
‘गदर’ चित्रपटात ‘सकिना’ आणि ‘तारा सिंह’ यांच्या मुलाची ‘चरणजीत’ची भूमिका अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याने साकारली होती. उत्कर्ष दुसऱ्या भागातही काम करणार आहे. याविषयी सांगताना अमीषा म्हणाली, “‘जीते’च्या भूमिकेसाठी मी उत्कर्षचे नाव सुचवले होते. आम्ही तेव्हा असंख्य मुलांच्या ऑडिशन घेत होतो. त्यावेळी मी अनिलजींना म्हणाले तुमचा मुलगा एवढा गोड आहे तुम्ही त्याची निवड का नाही करत? यानंतर मी निर्मात्यांशी चर्चा केली आणि उत्कर्षची निवड झाली.”
हेही वाचा : कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?
अमीषा पुढे म्हणाली, “अनिलजी जेव्हा सलग ३० ते ३२ तास शूट करायचे, तेव्हा लहान वयात उत्कर्ष सेटवर उपस्थित राहून काम करायचा. हे पाहून मी अनिलजींची चेष्ठा करत एकदा बोलले होते की, सेटवर तुमचा मुलगा आहे म्हणून, दुसऱ्या कोणाचा मुलगा असता तर एवढे काम पाहून पळून गेला असता…” दरम्यान, ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून पहिल्या भागाप्रमाणेच या ‘गदर २’साठी प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत.