दोन दशकांपूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “आलिया एवढं बजेट नव्हतं” रणवीर सिंहने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “तुला पैसे…”

‘गदर २’ मधील नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटातील “उड़ जा काले कावां” गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, सध्या ‘गदर २’ चित्रपट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटात सकीनाची भूमिका साकारणाऱ्या अमीषा पटेलने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : “दादा… तू जिंकलंस”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गरजू मुलाला अशी केली मदत; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही समस्यांचा सामना करावा लागला याबाबत अमीषाने ट्वीट केले आहे. अमीषा लिहिते की, चित्रपटाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या प्रोडक्शन हाऊसने सांभाळली होती. परंतु, या टीमने आजपर्यंत मेकअप आर्टिस्टपासून ते कपडे डिझाइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत असंख्य लोकांचे त्यांचे पगार दिलेले नाहीत.

हेही वाचा : “अमेरिकेत इस्त्रीवर पापड भाजले अन्…”, ‘बाईपण भारी देवा’च्या निमित्ताने वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट किस्सा

अमीषा दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिते की, “या सर्व लोकांना पगारच नाही तर अनेकदा शूटिंगदरम्यान झालेला खर्च आणि विमानाच्या तिकिटांचे पैसेही देण्यात आले नव्हते. शूटिंगला कुठेही जाण्यासाठी एकही गाडी देण्यात आली नव्हती त्यामुळे अनेकदा कलाकार आणि क्रू मेंबर्स अडकायचे. पण, या सगळ्या अडचणी झी स्टुडिओजने सोडवल्या. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे दिले यासाठी शारिक पटेल, नीरज जोशी, कबीर घोष यांचे विशेष आभार…”

दरम्यान, ‘गदर २’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून पहिल्या भागाप्रमाणेच या ‘गदर २’साठी प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ameesha patel accuses gadar 2 anil sharma productions for unpaid bills of crew members sva 00
Show comments