‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट येऊन २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे तरी आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामुळे हृतिक रोशन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटात हृतिकने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. हृतिकबरोबर अभिनेत्री अमिषा पटेलनंही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हृतिकचा पहिलाच चित्रपट ‘ब्लॉकबस्टर हिट’ ठरला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटामुळे हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हे दोघे रातोरात स्टार झाले. अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर २’मुळे चांगलीच चर्चेत. नुकतंच तिने एका मुलाखतीदरम्यान या ‘गदर – एक प्रेम कथा’ आणि ‘कहो ना प्यार है’ दरम्यानच्या शूटिंगचे वेगवेगळे किस्से शेअर केले आहेत. हे दोन्ही चित्रपट एकत्र चित्रीत करताना तिला आलेले अनुभव तिने शेअर केले आहेत.

आणखी वाचा : सप्टेंबर महिन्यात OTT चाहत्यांसाठी पर्वणी; ‘हे’ चित्रपट आणि वेबसीरिज करतील तुमचं भरपूर मनोरंजन

बॉलिवूड बबलशी संवाद साधताना अमिषा म्हणाली. “कहो ना प्यार है दरम्यान कोणालाच हृतिकवर विश्वास नव्हता. अमिताभ बच्चन यांचा मुलगा, तसेच फिरोज खान यांचा मुलगाही चित्रपटसृष्टीत आला होता. ही सगळीच मातब्बर कलाकारांची मुलं होती. इतकंच नव्हे तर खुद्द राकेश रोशन यांनाही हृतिकवर फारसा विश्वास नव्हता.”

याबरोबरच ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आमिर खान आणि शाहरुख खानच्या चित्रपटांबरोबर येऊ नये यासाठी राकेश रोशन यांनी पूर्णपणे खबरदारी घेतल्याचंही अमिषाने सांगितलं. याचदरम्यान शाहरुख खानचा ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ आणि आमिर खानचा ‘मेला’ हे दोन्ही चित्रपट आले. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले, पण हृतिक आणि अमिषाच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ameesha patel says nobody had a faith in hrithik roshan during kaho naa pyaar hai avn