बॉलिवूड किंग शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीवरुन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पठाण चित्रपटही बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला आहे.

‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असताना आता अमेरिकन पॉर्नस्टारला या चित्रपट गाण्याने भूरळ पाडली आहे. पॉर्नस्टार केंद्रा लस्ट हिने चित्रपटातील एका गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. केंद्राने तिच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> “हे भगवं आईस्क्रीम आहे, मी ते चाटणारच, यावर भाजपाचा…”, भगव्या बिकिनीच्या वादानंतर महिलेचा ‘तो’ VIDEO व्हायरल

हेही वाचा>>विस्कटलेले केस, वाढलेली दाढी अन्…; मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूतची झाली होती दयनीय अवस्था, जुना व्हिडीओ व्हायरल

केंद्राने शेअर केलेला सेक्सी डान्स व्हिडीओ हा एका पार्टीतील आहे. याआधीही केंद्राने ‘पठाण’ व शाहरुख खानप्रति तिचं असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. शाहरुख खानच्या वाढदिवशी केंद्राने पठाण चित्रपटाचं पोस्टर शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या होत्या. या चित्रपटाचं पोस्टरवर तिने स्वत:चा फोटो एडिट करुन लावला होता.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ट्रेलर लीक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खान व दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.